नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती क्षेत्राने सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात सक्रियता दर्शवत दमदार झेप घेतल्याचे मासिक सर्वेक्षणातून मंगळवारी पुढे आले. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या एस अँड पी ग्लोबल इंडियाद्वारे सर्वेक्षणावर बेतलेला, निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारा (पीएमआय) निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ५५.३ अंशांवर पोहोचला आहे. सप्टेंबमध्ये नोंदल्या गेलेल्या ५५.१ अंशांपेक्षा तो थोडा कमी आला असला तरी सलग सोळाव्या महिन्यात ५० गुणांपेक्षा अधिक म्हणजे त्याचा विस्तारदर्शक कल राहिला आहे.

कंपन्यांनी नवीन कामाच्या प्रमाणात सतत वाढ नोंदविताना, उत्पादनही वाढवत आणले आहे. मात्र मागणी वाढती राहिली तरी किमतीच्या वाढत्या दबावामुळे तिचा वेग मर्यादित राहिला असल्याचे सर्वेक्षण सांगते. कंपन्यांनी वाढीचा वेग गमावूनहीदेखील नवीन मागणी आणि उत्पादनात जोरदार वाढ कायम राखली आहे, असे निरीक्षण एस अँड पी ग्लोबल मार्केटच्या अर्थतज्ज्ञ पॉलिआना डी लिमा यांनी नोंदवले. ऑक्टोबरमध्ये ग्राहकोपयोगी वस्तूंचे क्षेत्र आघाडीवर राहिले आहे. कंपन्यांनी उत्पादन, एकूण विक्री आणि निर्यात वाढण्याचे संकेत दिले होते.

Centers Discrimination about onion export Know what is Farmers Association Onion Growers Allegation
कांदा निर्यातीबाबत केंद्राचा दुजाभाव? जाणून घ्या, शेतकरी संघटना, कांदा उत्पादकांचा आरोप
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

भारतीय उत्पादकांना ऑक्टोबर २०२३ पर्यंत उत्पादनांत वाढ होण्याची आशा आहे. चांगल्या विक्रीचे अंदाज आणि विपणन प्रयत्न यामुळे आगामी काळ उत्साहवर्धक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. व्यावसायिक आशावाददेखील वाढलेला असून सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर येत्या महिन्यातदेखील वस्तू-सेवांना मागणी अधिक राहण्याचा कयास वर्तविला जात आहे. यामुळे कंपन्यांकडून सतत उत्पादित वस्तूंच्या साठय़ात वाढ केली जात आहे. शिवाय विक्री अधिक वाढविण्यासाठी कंपन्यांनी क्षमतावाढीवर भर दिला आहे, असेही लिमा म्हणाल्या.