नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती उद्योगाच्या सक्रियतेचा निदर्शक असलेला औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ३.१ टक्के नोंदविण्यात आल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केले. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादनात (- उणे) ०.८ टक्क्यांपर्यंत आक्रसले होते, गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये औद्योगिक उत्पादनवाढीचा दर ४.४ टक्के राहिला होता.

जाहीर आकडेवारीनुसार, केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील महत्त्वाचा घटक अर्थात निर्मिती क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात १.८ टक्के वाढ झाली. वीजनिर्मिती क्षेत्रात ११.६ टक्के आणि तर खाण क्षेत्रात ४.६ टक्क्यांची उत्पादन वाढ झाली आहे. प्राथमिक वस्तू निर्माण क्षेत्रात ९.३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. ऑगस्ट २०२२ मध्ये ती १.७ टक्के नोंदली गेली होती. तर भांडवली वस्तूंचे उत्पादन १०.३ टक्क्यांनी वाढले. मात्र ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन (उणे) -४.५ टक्क्यापर्यंत घसरले.

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Highest production of mustard in the country this year pune news
देशात यंदा मोहरीचे उच्चांकी उत्पादन? १२०.९० लाख टन उत्पादनाचा अंदाज