फ्रँकफर्ट : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे युरो चलन वापरणाऱ्या १९ देशांमध्ये महागाईने नवा उच्चांक नोंदवला असून नैसर्गिक वायू आणि विजेचे दर नियंत्रणाबाहेर गेले आहेत.

युरोपचा आर्थिक विकास मंदावल्याने अर्थतज्ज्ञांनी मंदीची भीती व्यक्त केली आहे. वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर गेल्यामुळे युरोपातल्या नागरिकांची क्रयक्षमताही घटली आहे. ‘युरोस्टॅट’ या युरोपीय महासंघाच्या सांख्यिकी संस्थेने त्याबाबतची माहिती सोमवारी जाहीर केली.

joi biden
अन्वयार्थ: बायडेन प्रशासनाचा नैतिक विजय..
canara bank declared may 15 as the record date for the stock split scheme
कॅनरा बँकेकडून ‘समभाग विभागणी’ पात्रतेसाठी १५ मे रेकॉर्ड तारीख घोषित
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?

चलनवाढीचा वार्षिक दर सप्टेंबरमध्ये ९.९ टक्के होता. तो ऑॅक्टोबरमध्ये १०.७ टक्क्यांवर पोहोचला. १९९७ नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे.

युक्रेवरील आक्रमणानंतर रशियाने युरोपला होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा घटवल्याने त्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. रशियाच्या असहकारामुळे युरोपला वीजनिर्मिती आणि घरांमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी अमेरिकेसह कतार येथून जहाजाने येणाऱ्या महागडय़ा द्रवरूप वायू वापरावा लागत आहे.

 युरोपची हिवाळय़ाची गरज द्रवरूप वायूने भरून काढली आहे. मात्र त्याच्या किमती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे काही औद्योगिक उत्पादनांवर विपरीत परिणाम झाला आहे. स्टील आणि खतनिर्मितीला मोठा फटका बसला आहे.

इंधन, देयकांवरच अधिक खर्च

इंधन आणि विविध प्रकारांची देयके भरण्यावरच युरोपातल्या नागरिकांचा अधिक खर्च होत आहे. अन्नापदार्थासारख्या मूलभूत गोष्टी प्रचंड महाग झाल्यामुळे ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता कमी झाल्याचे ‘युरोस्टॅट’च्या अहवालातील निरीक्षण आहे.

आकडे काय सांगतात?

‘युरोस्टॅट’च्या आकडेवारीनुसार अन्न, मद्य आणि तंबाखूच्या किमतींनी जवळजवळ इंधन आणि विजेच्या किमतींची बरोबरी साधली आहे. गेल्या एक वर्षांच्या तुलनेत अन्न आणि मद्याच्या किमती १३.१ टक्क्यांनी, तर ऊर्जेच्या किंमती ४१.९ टक्क्यांनी वाढल्या आहेत.