रूपी बँकेच्या खातेदारांना २० हजार रुपये काढू देण्याच्या मुद्दय़ावरून मतभेदामुळे डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी  प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी नियुक्त करण्यात आलेल्या अरिवद खळदकर यांनीही मंगळवारी राजीनामा दिला. रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध लागू असलेल्या या बँकेच्या ताज्या समस्येबाबत आता सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. खात्यातून प्रत्येकी २० हजार रुपये काढू देण्याची मुभा देणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. या आदेशामुळे बँकेची आर्थिक स्थिती बिघडून बँक अवसायानात जाण्याच्या भीतीने प्रशासक मंडळात तीव्र मतभेद आहेत. याची परिणती डॉ. अभ्यंकर यांच्या राजीनाम्याने झाली. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी खळदकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्तीचे पत्र स्वीकारण्यापूर्वीच खळदकर यांनीही प्रशासक मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला.