डिजिटल माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील कंपनी केएसएस लिमिटेडने (पूर्वाश्रमीची के सेरा सेरा) भारतात प्रथमच सिनेमा प्रक्षेपणाचे ४के तंत्रज्ञान हे सोनी कॉर्पोरेशनच्या सहयोगाने प्रस्तुत केले आहे. केएसएस आणि सोनी यांच्या या सामंजस्यातून येत्या काळात देशातील विविध मल्टिप्लेक्स सिनेगृहांमध्ये ४के तंत्रज्ञानावर बेतलेले प्रोजेक्टर्स (प्रक्षेपक) बसविले जाणार आहेत. सध्या बहुतांश सिनेगृहांतील २के तंत्रज्ञानावरील प्रक्षेपकांच्या तुलनेत चार पटींनी अधिक चित्र सुस्पष्टता ४ के प्रक्षेपकांद्वारे सिनेमा प्रेक्षकांना अनुभवता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Kss ltd ties up with sony corp to bring in 4k cinema
First published on: 22-11-2014 at 04:11 IST