नवी दिल्ली : देशातील आघाडीची आयुर्विमा कंपनी ‘एलआयसी’च्या प्रारंभिक समभाग विक्रीवरील (आयपीओ) साशंकतेचा पडदा सरला असून, येत्या ४ मे पासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक भागविक्रीसाठी गुंतवणूकदारांना प्रति समभाग ९०२ रुपये ते ९४९ रुपयांदरम्यान बोली लावता येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी प्रति समभाग ६० रुपये आणि किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना ४० रुपयांची सूट मिळविता येणार आहे.

सूत्रांच्या हवाल्यानुसार, देशांतर्गत आणि विदेशातील अग्रणी १०० सुकाणू गुंतवणूकदारांनी या ‘आयपीओ’मध्ये सुमारे १३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास रस दाखविला आहे.

होणार काय?

४ मे रोजी गुंतवणुकीसाठी खुली होणारी ही भागविक्री ही ९ मेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

सरकारच्या तिजोरीत.

मूळ योजनेप्रमाणे पाच टक्क्यांऐवजी या प्रस्तावित भागविक्रीतून एलआयसीमधील ३.५ टक्के भागभांडवलाची सरकारकडून विक्री केली जाणार असून, त्यायोगे २१,००० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा होणे अपेक्षित आहे.