पंतप्रधान बँक खाते योजनेची सहा वर्षे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान जन धन योजनेने शुक्रवारी अस्तित्वाची सहा वर्षे पूर्ण के ली असून या दरम्यान देशभरात तिचे ४०.३५ कोटी लाभार्थी ठरले आहेत.

सरकारचे विविध लाभ थेट खात्यात पोहोचण्याच्या हेतूने ही योजना सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. सहा वर्षेपूर्तीनिमित्ताने शुक्रवारी या योजनेंतर्गत आणखी लाभ जाहीर करण्यात आले.

आर्थिक सर्वसमावेशकतेसाठी राष्ट्रीय ध्येय म्हणून पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकीर्दीत, २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना प्रत्यक्षात आणली होती. योजनेची घोषणा १५ ऑगस्ट रोजी के ली होती. सुरुवातीच्या टप्प्यात शून्य खाते असलेली ही योजना टीके चे लक्ष्यही बनली.

पंतप्रधान जन धन योजनेतील एकू ण शिल्लक रक्कम १.३१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून सरासरी ठेव प्रति खाते ३,२३९ रुपये आहे. पीएम किसान, मनरेगा, आयुर्विमा तसेच आरोग्यविमा छत्र आदींचे लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा २०१८ मध्ये विस्तार करण्यात आला.

गेल्या वर्षभरात जवळपास ३.६ कोटी जन धन खाती सुरू करण्यात आली. परिणामी त्यांची संख्या १९ ऑगस्ट २०२० अखेर ४०.३५ कोटींवर गेली. पैकी ३४.८१ कोटी (८६.३ टक्के ) जन धन खात्यांमध्ये नियमित व्यवहार होत आहेत.

जन धन खाती : ४०.३५ कोटी

शिल्लक रक्कम : १.३१ लाख कोटी रुपये सरासरी ठेव

प्रति खाते : ३,२३९ रुपये

Web Title: Pm jan dhan scheme completes six years zws
First published on: 29-08-2020 at 00:20 IST