आयडीबीआय बँक, फेडरल बँक या वाणिज्य बँका आणि युरोपस्थित विमा क्षेत्रातील अग्रणी एजीयस यांनी संयुक्तपणे स्थापित केलेल्या ‘आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स कंपनी लि.’ने आपल्या पहिल्यावहिल्या वार्षिक करोत्तर नफ्याची नोंद केली आहे. कार्यान्वयनानंतर पाचव्या वर्षांतच नफाक्षम बनणारी ही भारताच्या खासगी विमा क्षेत्रातील सर्वात वेगवान कामगिरी आहे. आर्थिक वर्ष २०१२-१३मध्ये आयडीबीआय फेडरलने ९.२४ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे.
भारतीय विमा उद्योगात नवीन पॉलिसींद्वारे हप्त्यांच्या उत्पन्नाचा उणे १५ टक्के असा नकारात्मक दर असताना, सरलेल्या वर्षांत आयडीबीआय-फेडरलने या उत्पन्नात केलेली २३ टक्क्यांची उमदी वाढ, हा या चमकदार कामगिरीसाठी कारणीभूत ठरलेला महत्त्वाचा घटक असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी जी. व्ही. नागेश्वर राव यांनी सांगितले. समस्त आयुर्विमा उद्योगापुढे खडतर आव्हाने उभी असून, वाढ सोडाच आहे तो व्यवसाय सांभाळणेही जिकिरीचे बनले असताना, आपल्या या कामगिरीचे लक्षणीय वेगळेपण ठळकपणे अधोरेखित होते. शिवाय ‘युलिप’ योजनांबाबत लोकांचा भ्रमनिरास झाल्याचे आपण वेळीच ओळखले आणि कंपनीच्या विमा उत्पादनात युलिपऐवजी दीर्घ मुदतीच्या पारंपरिक योजनांवर दिलेला भरही उपयुक्त ठरला, असे नागेश्वर राव यांनी स्पष्ट केले. सध्या ८१-२१ असे युलिप व पारंपरिक योजना असे गुणोत्तर असलेल्या आयडीबीआय फेडरलच्या इक्विटी फंडाची सध्या कार्यरत ७२ युलिप योजनांमध्ये अव्वल कामगिरीचा फंड म्हणून गणना होते.
आगामी काळातही हा नवीन हप्त्यांमध्ये वाढीचा दर असाच कायम ठेवला जाईल, असा विश्वास नागेश्वर राव यांनी व्यक्त केला. नजीकच्या काळात ग्रुप पेन्शन योजना दाखल करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.  

आयुर्विम्यात नफ्याला ओहोटी
२०१२-१३ आर्थिक खासगी आयुर्विमा कंपन्यांची आर्थिक कामगिरी
   कंपनी     नफ्याचे प्रमाण
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल    ८%
एसबीआय लाइफ    १२%
कोटक महिंद्र ओल्ड म्युच्युअल    -७३%