रिझव्र्ह बँकेने वाणिज्य बँकांची रोकड उपलब्धतता सुलभ केल्याचा थेट परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेने मुदत ठेवींच्या दरवाढीतून दाखवून दिला. देशातील या सर्वात मोठय़ा बँकेने एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या १८० ते २१० दिवस कालावधीच्या ठेवींसाठी आता ६.८० टक्क्यांच्या ऐवजी ७ टक्के वार्षिक व्याजदर देऊ केला आहे.
 स्टेट बँकेचे नवे दर शुक्रवार, धनत्रयोदशीपासूनच लागू होत आहेत. बँकेने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवींवरील व्याजदर मात्र पाव ते दोन टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. अशा रकमांच्या ७ ते ६० दिवसांपर्यंतच्या ठेवींवर ६.५०% तसेच ६१ दिवस ते एक वर्ष मुदतीसाठी ७.७५% व्याज दिले जाईल. एक कोटींवरील ठेवींवर २ ते १० वर्षे मुदतीसाठी ८.५० टक्के व्याजदर लागू होईल.