भारतीय रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी पतधोरण जाहीर केलं. केंद्रीय बँकेनं रेपो रेट कायम ठेवल्यानं व्याजदर जैसे थे राहणार आहेत. पतधोरण आढावा समितीनं एकमतानं रेपो रेट ४ टक्केच ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी याची घोषणा केली. यावेळी आगामी आर्थिक वर्षात जीडीपी १०.५ टक्के राहिल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय बँकेने रिव्हर्स रेपो रेटही कायम ठेवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी याची माहिती दिली. पूर्वीचा असलेला रेपो रेट ४ टक्केच कायम ठेवण्यााचा निर्णय घेतला आहे. रिव्हर्स रेपो रेटही ३.३५ टक्के ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर एमएसएफ आणि बँक रेटमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आगामी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीपीडी वाढीचा दर १०.५ टक्के इतका निर्धारित करण्यात आला आहे. आर्थिक पाहणी अहवालात याचा दर ११ टक्के राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

आणखी वाचा- मोठा खुलासा! एकाच व्यक्तीच्या PF खात्यावर १०३ कोटी रुपये तर १.२३ लाख खात्यांमध्येच आहेत ६५,५०० कोटी

हळूहळू घरांची विक्री वाढू लागली आहे. त्याचबरोबर लोकांची खरेदी शक्तीही पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे. अलिकडेच जो सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडण्यात आला, त्यामुळे गुंतवणुकीची परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. पुढील जानेवारी ते मार्च या काळात महगाई दर ५.२ टक्के इतका राहिल, अशी माहिती गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. पतधोरण जाहीर होण्याचा पार्श्वभूमीवर शेअर बाजारातही उत्साह बघायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींनी मोठी उसळी घेतली. सेन्सेक्सने ५१००० चा आकडा पार केला. तर निफ्टीही १५००० च्या पुढे गेला.

Web Title: Rbi keeps key rates unchanged bmh
First published on: 05-02-2021 at 12:31 IST