एनपीएस, अटल पेन्शनचे ४.२८ कोटींहून अधिक धारक

मुंबई : राष्ट्रीय निवृत्ती निधी (एनपीएस) आणि अटल निवृत्ती योजनेअंतर्गत मालमत्ता व्यवस्थापन (एयूएम) करणाऱ्या निवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) ६ लाख कोटी रुपयांचा मैलाचा टप्पा पार केल्याची घोषणा बुधवारी केली.

राष्ट्रीय निवृत्ती निधी व अटल निवृत्ती योजना गेल्या १३ वर्षांपासून पीएफआरडीएच्या अखत्यारीत आहे. गेल्या सात महिन्यांतच मालमत्ता १ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. गेल्या आठवडाअखेर एकूण रक्कम ६.०३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

पीएफआरडीएने गेल्या काही वर्षांत एनपीएस ग्राहकांमध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली असून या योजनेत २१ मे २०२१ अखेर ७४.१० लाख सरकारी कर्मचारी आणि बिगर-सरकारी क्षेत्रातील २८.३७ लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. पीएफआरडीएचे एकूण ग्राहक वाढून ४.२८ कोटी झाले आहेत. ऑक्टोबर २०२० अखेर निवृत्ती निधी व्यवस्थापनाची रक्कम ५ लाख कोटी रुपये होती.

निवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)चे अध्यक्ष एस. बंदोपाध्याय यांनी सांगितले की, आम्ही एयूएमच्या अनोख्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. एनपीएस आणि पीएफआरडीएमध्ये विश्वास असलेल्या ग्राहकांचे हे यश दर्शवते. वैश्विक साथीच्या कालावधीत वाढणारी याबाबतची जाणीव म्हणजे सेवानिवृत्तीच्या नियोजनाला व्यक्तींनी दिलेली प्राथमिकता म्हणजे त्यांचे आर्थिक हित जपण्यासाठी त्यांनी टाकलेली पावले होत.

निवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) हा संवैधानिक प्राधिकारी संस्था आहे. संसदेच्या अधिनियमाद्वारे स्थापन केलेली राष्ट्रीय निवृत्ती निधी (एनपीएस) आणि निवृत्ती योजनांची सुव्यवस्था वाढीसाठी याची अंमलबजावणी केली जाते. एनपीएसला जानेवारी २००४ पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसूचित करण्यात आले आणि त्यानंतर जवळजवळ सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू केली. एनपीएस सर्व भारतीय नागरिकांना (रहिवासी/ अनिवासी/परदेशी) ऐच्छिक तत्त्वावर व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी विस्तारण्यात आले.