मुंबई : बँकिंग, माहिती-तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने शुक्रवारी उत्तरार्धातील सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४६० अंशांची घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स ४६०.१९ अंशांच्या घसरणीसह ५७,०६०.८७ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने शुक्रवारच्या सत्रात ५७,९७५.४८ अंशांची उच्चांकी पातळीला स्पर्श केला. मात्र दुपारच्या सत्रात जोरदार समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे निर्देशांकाने ५६,९०२.३० अंशांचा तळ गाठला. निफ्टीमध्ये १४२.५० अंशांची घसरण झाली आणि तो १७,१०२.५५ पातळीवर स्थिरावला.