‘फेड’च्या अनुकूल निर्णयाने तेजी अनुभवलेल्या बाजारात शुक्रवारी मात्र वरच्या स्तरावर झालेल्या नफावसुलीने प्रमुख निर्देशांकामध्ये घसरण दिसून आली. परिणामी सेन्सेक्स १०४.९१ अंशांनी घरंगळून, २८,६६८.२२ स्तरावर खाली आला. मुख्यत: गुरुवारच्या तेजीत वधारलेल्या बँकांच्या समभागांना विक्रीची सर्वाधिक झळ सोसावी लागली. तथापि साप्ताहिक स्तरावर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी सलग तिसऱ्या आठवडय़ात वाढ नोंदविली आहे. गेल्या शुक्रवारच्या बंद पातळीवरून या सप्ताहाभरात या निर्देशांकांनी अनुक्रमे ६९.१९ अंश आणि ५१.७० अंश अशी कमाई केली आहे.

गुरुवारच्या तेजीत मोठी मागणी मिळालेल्या खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँक शुक्रवारी झालेल्या व्यवहारात सर्वाधिक ५.४८ टक्केघसरून ५५७.४० रुपयांवर, तर आयसीआयसीआय बँक (१.३६ टक्के), स्टेट बँक (१.१५ टक्के) यांनी मोठी घसरण अनुभवली.