शेअर बाजारात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला ६२०००चा टप्पा; IRCTCच्या शेअरमध्ये जोरदार वाढ

शेअर बाजार आज पुन्हा एका नवीन उच्चांकासह उघडला आहे, ज्यामुळे आणखी एक इतिहास निर्माण झाला.

Share Market Live Updates Stock market sensex 62000 nifty 18600
(Express photo by Ganesh Shirsekar)

शेअर बाजार आज पुन्हा एका नवीन उच्चांकासह उघडला आहे, ज्यामुळे आणखी एक इतिहास निर्माण झाला. बीएसईचा 30-स्टॉकचा निर्देशांक सेन्सेक्स ३९०.८९ अंकांसह ६२,१५६.४८ वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील १८,६०२.३५ च्या नवीन विक्रमासह व्यापार सुरु झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २८९.१७ अंकांच्या वाढीसह ६२,०५४.७६ वर होता, तर निफ्टी ८०.५५ अंकांच्या वाढीसह १८,५५७.६० वर होता.

आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये मजबूत तेजीचा कल आजही कायम आहे. गेल्या ५ सत्रांमध्ये तो सुमारे ३० टक्क्यांनी वाढून ६२८४ रुपयांवर पोहोचला आहे. एनएसइवर आज तो ६१४०.३० रुपयांवर उघडला आणि सकाळी ९.३० पर्यंत ६३३४ च्या पातळीला स्पर्श केला. एल अँड टी, विप्रो, भारती एअरटेल, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व सुरुवातीच्या व्यापारात निफ्टीच्या सर्वाधिक लाभधारकांच्या यादीत होते. आयटीसी, एस्कॉर्ट्स मोटर्स, अल्ट्राटेक, आयओसी आणि टाइट सारखे स्टॉकमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नाही.

सलग सातव्या ट्रेडिंग सत्रात सोमवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १२.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईचा ३०-शेअरचा सेन्सेक्स ४५९.६४ अंकानी म्हणजे ०.७५ टक्क्यांनी वाढून ६१,७६५.५९ अंकांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान, ६१,९६३.०७ गुणांवर गेला. गेल्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये सेन्सेक्सने २,५७५.८६ अंकांनी म्हणजेच ४.३५ टक्क्यांनी वाढला आहे. बाजारात या तेजीमुळे, बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १२,४९,०५९.८८ कोटी रुपयांनी वाढून केवळ सात ट्रेडिंग सत्रांमध्ये २,७४,६९,६०६.९३ कोटी रुपयांवर गेला.

एल अँड टी चा शेअर ट्रेडिंगच्या सुरुवातीला ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. सध्या हा शेअर ६,६८० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. कंपनी आज तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल, ज्यामध्ये कंपनीचा नफा निश्चित असल्याचे मानले जाते. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ११.१ टक्क्यांनी वाढून ५५१.७ कोटी रुपये झाला. तसेच, तिमाही निकालांच्या आधारावर, कंपनीच्या महसुलात ८.८ टक्के वाढ नोंदवली गेली आणि ती ३,४६२५ कोटी वरून ३,७६७ कोटी झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Share market live updates stock market sensex 62000 nifty 18600 abn

ताज्या बातम्या