पीटीआय, नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने केएसके महानदी पॉवरचे वसुली थकलेले कर्ज खाते आदित्य बिर्ला मालमत्ता पुनर्रचना कंपनीकडे (एआरसी) शुक्रवारी हस्तांतरित केले. स्टेट बँकेने यातून थकीत कर्जाच्या तुलनेत जवळपास ५८ टक्क्यांची तूट सोसून १,६२२ कोटी रुपये मिळविले आहेत.

एप्रिल २०२२ च्या आकडेवारीनुसार, स्टेट बँकेचे केएसके महानदी पॉवरकडे ३,८१५.०४ कोटी रुपयांचे थकीत कर्ज होते. स्टेट बँकेने खुल्या विक्रीच्या माध्यमातून १,५४४.०८ कोटी रुपयांच्या राखीव किमतीवर १०० टक्के रोख आधारावर २० एप्रिल २०२२ रोजी ई लिलाव प्रक्रिया जाहीर केली होती. स्टेट बँकेला यासाठी १५ इरादा पत्रे प्राप्त झाली होती. मात्र मेअखेरीस झालेल्या ई -लिलावात आदित्य बिर्ला एआरसीकडून १,५४४.०८ कोटी रुपयांची केवळ एकच बोली येऊ शकली.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Why Buy Most BH Series Vehicle Number in Pune Who can get this number
विश्लेषण : सर्वाधिक BH मालिका वाहन क्रमांकाची खरेदी पुण्यात का? हा क्रमांक कुणाला मिळू शकतो?
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

 लिलावात कोणतीही प्रतिस्पर्धी बोली न आल्याने चर्चेच्या फेरीनंतर अखेर १,६२२ रुपयांना कर्ज मालमत्तेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. केएसके महानदी पॉवरचे थकीत कर्ज प्रकरण जून २०१९ मध्ये नादारी आणि दिवाळखोरी संहिता प्रक्रियेतून निवाडय़ासाठी दाखल केले गेले आहे.