scorecardresearch

शेअर बाजारातील सर्व विक्रम मोडीत; सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला ६० हजारांचा टप्पा तर निफ्टी १८ हजारांच्या जवळ

सेन्सेक्समध्ये सुमारे ९ महिन्यांत १० हजार अंकांची वाढ झाली आहे तर याआधी जानेवारी महिन्यात सेन्सेक्सने ५० हजारांचा टप्पा ओलांडला होता.

शेअर बाजारातील सर्व विक्रम मोडीत; सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला ६० हजारांचा टप्पा तर निफ्टी १८ हजारांच्या जवळ
(Express photo by Partha Paul)

भारतीय शेअर बाजार सध्या शिखरावर पोहोचला आहे. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, सेन्सेक्स ऐतिहासिक वाढीसह सुरु झाला आहे. सेन्सेक्सने ६० हजारांची विक्रमी पातळी ओलांडली आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे ९ महिन्यांत १० हजार अंकांची वाढ झाली आहे. याआधी जानेवारी महिन्यात सेन्सेक्सने ५० हजारांचा टप्पा ओलांडला होता. निफ्टीदेखील नवे विक्रम करत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. कोणत्याही क्षणी निफ्टी १८ हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

निफ्टी मिड कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसमध्ये वाढ झाली आहे. निफ्टीच्या ५० पैकी ३८ शेअर्समध्ये नफा दिसून येत आहे. त्याचबरोबर १२ समभागांमध्ये घसरण आहे

गेल्या काही महिन्यांत भारतीय शेअर बाजारात सतत वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारात विदेशी भांडवलाची आवक अपेक्षेपेक्षा जास्त झाली आहे. या व्यतिरिक्त, देशाच्या अर्थव्यवस्थेला लसीकरणाचा लाभ मिळत आहे आणि करोनाच्या प्रकरणामधील घट तसेच अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची कारणे आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील कंपन्यांचे आर्थिक परिणामही अपेक्षेपेक्षा चांगले दिसत आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2021 at 10:03 IST

संबंधित बातम्या