रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर ‘फोन पे’ या डिजिटल पेमेंट अ‍ॅपला सर्वाधिक फटका बसला. आरबीआयने येस बँकेच्या अनेक सेवांवर निर्बंध घातले आहेत. त्याचा ‘फोन पे’ या फायनान्शिअल टेक्नोलॉजी कंपनीवर सर्वाधिक परिणाम झाला. ज्या युझर्सचे अकाऊंट येस बँकेमध्ये आहे, त्यांना ‘फोन पे’ च्या अ‍ॅपवरुन व्यवहार करताना अडचणी आल्या. ‘फोन पे’ हे यूपीआय आधारीत डिजिटल पेमेंटची सुविधा देणारे अ‍ॅप आहे.

दरम्यान आता ‘फोन पे’ ची सेवा आता पूर्ववत झाली आहे. ग्राहक या अ‍ॅपवरुन पूर्वीसारखए व्यवहार करु शकतात. लोकांनी संयम बाळगल्याबद्दल फोन पे ने आभारही मानले आहेत.

आरबीआयने आमच्या पार्टनर बँकेवर निर्बंध आणले आहेत. सेवा पूर्ववत करण्यासाठी आमची पूर्ण टीम प्रयत्न करत आहे. तुम्हाला जो त्रास होतोय त्याबद्दल आम्हाला खेद वाटतोय असे टि्वट फोन पे चे सीईओ समीर निगम यांनी केले होते.