26 November 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : आधुनिक भारताची नवरत्न शिलेदार

गेल्या पन्नास वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक्स ही एक मल्टी-प्रॉडक्ट, मल्टी-टेक्नॉलॉजी, मल्टी-युनिट कंपनी बनली आहे

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या इलेक्ट्रॉनिक्सविषयीच्या विशेष गरजा भागविण्यासाठी भारत सरकारने १९५४ मध्ये संरक्षण मंत्रालयामार्फत बेंगळूरु येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ची स्थापना केली होती. गेल्या पन्नास वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक्स ही एक मल्टी-प्रॉडक्ट, मल्टी-टेक्नॉलॉजी, मल्टी-युनिट कंपनी बनली आहे जी भारतात आणि विदेशात विविध क्षेत्रांत ग्राहकांच्या गरजा भागवते. बीईएल हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या अभिजात गटामध्ये आहे, ज्यास भारत सरकारने नवरत्न दर्जा प्रदान केला आहे. कंपनीची वर्षांनुवर्षे होणारी वाढ आणि विविधता, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दखल घेत बीईएलने आपला प्रगतीचा वेग कायम ठेवला आहे.

बीईएलची ऑप्ट्रॉनिक डिव्हाइसेस ही एक साहाय्यक कंपनी आहे जी सैन्य, सुरक्षा आणि वाणिज्यिक प्रणालींमध्ये वापरण्यासाठी इमेज इन्टिफायर टय़ूब आणि संबंधित उच्च व्होल्टेज वीज पुरवठा युनिट्सचे संशोधन, विकास आणि उत्पादन करण्यासाठी स्थापित केली आहे. ही कंपनी पुणे येथील भोसरी औद्योगिक क्षेत्रात आहे.

* संरक्षण – या बीईएलअंतर्गत संप्रेषण, रडार, नेव्हल सिस्टम, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम, शस्त्र प्रणाली, टँक इलेक्ट्रॉनिक्स आणि सिम्युलेटरसाठी उत्पादने उपलब्ध आहेत.

* इतर इलेक्ट्रॉनिक्स – स्विचिंग उपकरणे, टीव्ही आणि प्रसारण, डीटीएच, टेलिकॉम, सिम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन

*  इलेक्ट्रॉनिक सिस्टम / टर्नकी सोल्युशन्स – हे सी 4 आय सोल्यूशन्स, सॅटकॉम नेटवर्क आणि व्हीटीएमएस देते.

’ इतर सेवा – कंपनीकडून प्रामुख्याने भारतीय संरक्षण दल, पॅरा-मिलिटरी फोर्स, रडार आणि सोनार्स तसेच नागरी उड्डाण, हवामान विभाग, अवकाश विभाग, दूरसंचार विभाग, ऊर्जा क्षेत्र, तेल उद्योग, रेल्वे, अखिल भारतीय रेडिओ, दूरचित्रवाणी या क्षेत्रातील कंपन्यांना सेवा पुरविली जाते. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग, डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग सव्‍‌र्हिसेस, सेमीकंडक्टर डिव्हाइस पॅकेजिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि क्वालिटी अश्युरन्स सुविधा इत्यादी सेवांचा समावेश होतो.

बीईएल आपली उत्पादने कॅनडा, बेल्जियम, इटली, फ्रान्स, इंडोनेशिया, इजिप्त, स्वित्झर्लंड, मलेशिया, रशिया, ब्राझील, श्रीलंका, नेपाळ, इस्रायल, दक्षिण आफ्रिका,संयुक्त अरब अमिरात, तुर्कस्तान, ब्रिटन, जर्मनी, झिम्बाब्वे, केनिया, इ. अनेक देशांमध्ये निर्यात करते.

सप्टेंबर २०२० साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल कंपनीने नुकतेच जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीने करोनाकाळातही अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीने ३,१६५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत उलाढालीत ती १८.९ टक्के अधिक असून नक्त नफ्यातही १७ टक्के वाढ होऊन तो ३९७ कोटीवर गेला आहे.  कंपनीची आतापर्यंतची कामगिरी आणि संरक्षण क्षेत्राचे वाढते महत्त्व लक्षात घेता कुठलेही कर्ज नसलेली बीईएल ही दिवाळीची आकर्षक खरेदी ठरू शकते.

दोन आठवडय़ापूर्वी सुचविलेल्या ‘केअर रेटिंग्ज’ने उत्तम तिमाही कामगिरी दाखवल्याने, अत्यल्प कालावधीत ४५ टक्क्यांहून जास्त झेप घेतली आहे. ज्या वाचकांनी हा समभाग घेतला असेल ते नफा पदरात पडून घेऊ शकतात.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीएसई कोड – ५०००४९)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  ९६.६५

लार्ज कॅप

प्रवर्तक : भारत सरकार

व्यवसाय : इलेक्ट्रॉनिक्स / संरक्षण क्षेत्र

बाजार भांडवल : रु.  २३,५५० कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  ११८/५६

भागभांडवली भरणा : रु. २४३.६६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक     ५१.१४

परदेशी गुंतवणूकदार  ९.६०

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ३१.५९

इतर/ जनता ७.६७

पुस्तकी मूल्य : रु. ४१.३

दर्शनी मूल्य :   रु. १/-

लाभांश :   २८०%

प्रति समभाग उत्पन्न : रु. ६.८४

किंमत उत्पन्न गुणोत्तर : १३.५

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर : १२.८

डेट इक्विटी गुणोत्तर : ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ६७४

रिटर्न ऑन कॅपिटल : २५.४

बीटा :     ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:48 am

Web Title: article on bharat electronics limited portfolio abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : चांदणे शिंपित जाशी..
2 नावात काय : रोजमेळ
3 अर्थ वल्लभ : स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
Just Now!
X