अजय वाळिंबे

वर्ष १९८४ मध्ये स्थापन झालेली भन्साली इंजिनीयरिंग पॉलिमर लिमिटेड भारतीय बाजारात एबीएस रेझिन, एईएस रेझिन, एएसए रेझिन, एसएएन रेझिन आणि त्यांचे मिश्र धातूंच्या इतर प्लास्टिकचे उत्पादन करते. कंपनीने निप्पॉन ए अँड एल इन्क. या जपानी कंपनीशी भागीदारी करून त्यांच्या तांत्रिक साहाय्याने जागतिक दर्जाचे स्टाइरेनिक्स रेझिनचे उत्पादन सुरू केले आहे.

कंपनीच्या ग्राहकांमध्ये ऑटोमोबाइल्स, होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स, हेल्थकेअर आणि किचनवेअरमध्ये काम करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांचा समावेश आहे. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता राखण्यासाठी तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कंपनीने कायम संशोधनावर भर दिला आहे. राजस्थानच्या आबू रोड स्थित कंपनीच्या आर अँड डी सेंटरने ऑटोमोबाइल आणि होम अप्लायन्सेस सेगमेंटसाठी एबीएसचे वेगवेगळ्या २० ग्रेड यशस्वीरीत्या विकसित केल्या आहेत जे सध्या परदेशी उत्पादकांकडून आयात केल्या जात आहेत.

कंपनीचे राजस्थान आणि मध्य प्रदेशात दोन अद्ययावत उत्पादन प्रकल्प असून पॉलिमरची एकूण १३७,००० टीपीए उत्पादन क्षमता आहे. इतर उत्पादनात कंपनीने आपली क्षमता १०,००,००० टीपीए ते १७,००,००० टीपीएपर्यंत वाढवली आहे. गेली अनेक वर्ष कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेली तीन वर्ष कंपनीचा सरासरी रिटर्न ऑफ इक्विटी जवळपास ४० टक्के आहे. मार्च २०२१ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने १,२९२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३३३.४१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो तब्बल ३९९ टक्कय़ांनी अधिक आहे. प्रत्येक पडझडीला एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून भन्साली इंजिनीयरिंगचा नक्की विचार करा.

भन्साली इंजिनीयरिंग पॉलिमर्स लिमिटेड 

(बीएसई कोड – ५०००५२)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १७७/-

उच्चांक/ नीचांक : रु. १९७ / ३९

बाजार भांडवल :

रु. २,९४८ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १६.५९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ५६.४५

परदेशी गुंतवणूकदार      ०.९५

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ०.०२

इतर/ जनता     ४२.५८

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : स्मॉल कॅप

* प्रवर्तक       : बी. एम. भन्साली

* व्यवसाय क्षेत्र  : पॉलीमर्स

६ पुस्तकी मूल्य : रु. ४१.१

* दर्शनी मूल्य : रु. १/-

* गतवर्षीचा लाभांश     : १००%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु.२०.१

*  पी/ई गुणोत्तर :      ८.९

*  समग्र पी/ई गुणोत्तर :       ९.८

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ००

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :           ७१०

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :       ८६.२

*  बीटा :      ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.