|| अजय वाळिंबे

कमिन्स इंडिया लिमिटेड (बीएसई कोड ५००४८०)

वर्ष १९६२ मध्ये स्थापन झालेली कमिन्स इंडिया लिमिटेड ही अमेरिकन कंपनी कमिन्स इन्कची ५१ टक्के मालकी असलेली उपकंपनी आहे. देशातील डिझेल आणि नसíगक वायूवर चालणाऱ्या वाहनांच्या इंजिनांची कमिन्स इंडिया आघाडीची उत्पादक आहे.

भारतात कमिन्स ग्रुपच्या सात कंपन्या असून त्यापकी एक, कमिन्स इंडिया लिमिटेड ही शेअर बाजारात सूचीबद्ध असून कंपनी मुख्यत्वे – इंजिन, पॉवर सिस्टीम्स आणि वितरण या तीन व्यवसायात आहे.

इंजिन व्यवसाय ६० एचपीपासून इंजिनचे उत्पादन-कमी, मध्यम आणि हेवी-डय़ूटी- कॉमíशयल व्हेइकल मार्केट्स आणि बांधकाम आणि कॉम्प्रेशन उद्योगासाठी वापर.

पॉवर सिस्टीम्स व्यवसाय ७०० एचपी ते ३७५० केव्हीए श्रेणीत इंटिग्रेटेड जनरेटर सेट्ससह सोलर हॉर्सपॉवर इंजिनांची निर्मिती ७०० एचपी ते ४५०० एचपीपर्यंत तसेच पॉवर जनरेशन इंजिनांसह करते. आपल्या उपकरणासाठी व अन्य उपकरणांच्या वितरण, पॅकेजेस, सेवा व्यवसायातही कमिन्स इंडिया कार्यरत आहे.

कंपनीच्या देशभरात १२० हून अधिक वितरण शाखा कार्यालये असून त्याखेरीज कंपनी ४५० सेवा टच पॉइंट्सद्वारे, आपला व्यवसाय आणि सेवा पुरवते. कमिन्सचे सुमारे ३५०० हून अधिक प्रशिक्षित अभियंते आणि तंत्रज्ञांचे जाळे असून  ते विविध बाजारपेठेतील सर्व ग्राहकांना सेवा प्रदान करतात.

गेली दोन र्वष मंदीसदृश वातावरणामुळे कंपनीची कामगिरी तितकीशी प्रभावी झालेली नाही. मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने उलाढालीत १२ टक्के वाढ साध्य करून ती ५,६५९ कोटी रुपयांवर नेली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत नक्त नफ्यात ९ टक्के वाढ होऊन तो ७२२.५७ कोटी रुपयांवर गेला आहे. कुठलेही कर्ज नसलेली ही अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ७५० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. सध्याच्या शेअर बाजारातील वातावरणात असे उत्तम शेअर्स खरेदी करायची संधी असते. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कमिन्स इंडियाचा तुमच्या पोर्टफोलिओसाठी जरूर विचार करा. सध्याच्या बाजारात हा शेअर अजूनही खाली येऊ शकतो. त्यामुळे खरेदी टप्प्याटप्प्याने करावी.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.