27 September 2020

News Flash

फंड विश्लेषण : खऱ्या अर्थाने ‘डायनॅमिक’!

जुलै महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर अनपेक्षित वाढविल्याने संभाव्य नुकसान कमी झाले.

  • ॅक्सिस डायनॅमिक बॉण्ड फंड

व्याज दरवाढ आणि कपात असे आवर्तन पूर्ण केलेल्या काळात .९६ टक्के परतावा देणारा फंड आपल्या गुंतवणुकीचा नक्कीच भाग असायला हवा. डायनॅमिकम्हटले जाणारे खूप कमी बॉँण्ड फंड आहेत जे वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखून आपल्या गुंतवणूक धोरणात वेळीच बदल करीत असतात.

सरलेल्या २७ एप्रिलला अ‍ॅक्सिस डायनॅमिक बॉण्ड फंडाने पाच वर्षे पूर्ण केली असून ज्या गुंतवणूकदारांनी फंडात सुरुवातीपासून गुंतवणूक केली आहे, अशा गुंतवणूकदारांना फंडाने ८.९६टक्के वार्षिक परतावा दिला आहे. भारतातील रोखे गुंतवणूकदारांनी मार्च २०१० ते जानेवारी २०१५ या काळात व्याज दरवाढ अनुभवली व जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१६ या काळात १.५टक्के व्याज दर कपातीचा अनुभव घेतला. व्याज दरवाढ आणि कपात असे आवर्तन अनुभवलेल्या काळात ८.९६टक्के परतावा देणारा फंड आपल्या गुंतवणुकीचा नक्कीच भाग असायला हवा. डायनॅमिक बॉण्ड फंड हा सतत सक्रिय राहून गुंतवणूकदारांना परतावा देणाऱ्या प्रकारात मोडतो; परंतु भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात असे अतिशय कमी डायनॅमिक बॉण्ड फंड आहेत जे वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखून आपल्या गुंतवणूक धोरणात सतत बदल करतात.

क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक वेळी मोठे फटके मारायला हवेत असे नाही. धावफलक सतत हलता ठेवूनसुद्धा सामना जिंकता येतो. अ‍ॅक्सिस डायनॅमिक बॉण्ड फंडाचे निधी व्यवस्थापक शिवकुमार व देवांग शहा धावफलक सतत हलता ठेवण्याचे काम करीत असल्याने हा फंडाची पत मॉर्निग स्टारने ‘चार तारे’, तर व्हॅल्यू रिसर्चने ‘तीन तारे’ निश्चित केली आहे.

वाढत्या व्याजदराच्या काळात फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या रोख्यांची सरासरी मुदतपूर्ती ३-३.५ वर्षे ठेवली होती. कमी मुदतीचे रोखे व्याजदराबाबत दीर्घमुदतीच्या रोख्यांपेक्षा कमी संवेदनशील असल्याने वाढत्या व्याजदर परिस्थितीत हा फंड एखाद्या शॉर्ट टर्म फंडासारखा चालविला जाणे योग्यच होते. या अचूक निर्णयाचा परिणाम एप्रिल २०१२ ते मे २०१३ या कालावधीत या फंडाने स्वप्नवत १० टक्क्यांहून अधिक परतावा दिला. रुपया डॉलर विनिमय दरात होणारी हालचाल व वित्तीय खात्यावरील तूट यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर सावट येण्याची शक्यता वेळीच ओळखणारे जे मोजके निधी व्यवस्थापक होते त्या निधी व्यवस्थापकांमध्ये शिवकुमार व देवांग शहा हे आहेत. वेळीच आभासी रोकड व अल्प मुदतीच्या रोख्यात गुंतवणूक करून त्याने ते दाखवून दिले.
arth-2

जुलै महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर अनपेक्षित वाढविल्याने संभाव्य नुकसान कमी झाले. कालांतराने महागाईचा दर कमी झाल्यावर व रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या पातळीवर महागाईचा दर स्थिरावेल असे जेव्हा वाटले तेव्हा त्यांच्या गुंतवणुकीतील रोख्यांची सार्वाधिक सरासरी मुदत १४ वर्षे होती. त्यामुळे व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेने मुदत वाढवत नेल्याने हा फंड लाँग टर्म गिल्ट फंड असल्याप्रमाणे त्यांनी चालविला. डायनॅमिक बॉण्ड फंडाकडून नेमके हेच अपेक्षित आहे. परंतु थोडेच बॉण्ड फंड खऱ्या अर्थाने सक्रिय सहभाग असल्यासारखे (Dynamic) चालविले जातात. व्याज दरकपातीचे आवर्तन जवळजवळ पूर्ण झाल्याने व नजीकच्या काळात मोठी दर कपात दृष्टिपथात नसल्याने फंडांची सध्याची रोख्यांची सरासरी मुदतपूर्ती (Modified Duration) ६.७ वर्षे असणे एकंदर अर्थ परिमाणे पाहता योग्य वाटते.

हा फंड कॉर्पोरेट बॉण्ड फंड असूनही या फंडाच्या गुंतवणुकीत सरकारी रोखे वज्र्य नाहीत. सरकारी रोख्यांत मोठी रोकड सुलभता असल्याने सुयोग्य सरासरी मुदतपूर्ती राखणे व वेगाने कमी अधिक करणे सहज शक्य होते. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत ८२.२२ टक्के सरकारी रोखे व १७.७८ टक्के अव्वल पत असलेल्या कंपन्यांच्या रोख्यांचा समावेश आहे.

आपल्या गुंतवणुकीत योग्य फंडांची निवड करणे मुळीच सोपे नसते. परंतु एकदा का आपल्या गुंतवणुकीतील समभागांचे व रोख्यांचे प्रमाण निश्चित झाले की त्याप्रमाणनुसार गुंतवणूक करणे हे आवश्यक आहे. गुंतवणुकीतील एकदा का नियम पाळायचे ठरविले की सर्व काम सोपे होते. अ‍ॅक्सिस डायनॅमिक बॉण्ड फंड हा कमी पत असलेले रोख्यात गुंतवणूक न करणारा फंड आहे. केवळ अव्वल रोख्यांत गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेतील रोकड सुलभतेचा विचार करून मुदतपूर्ती कमी-अधिक करणारा हा फंड आहे.
arth-3

या फंडात आगामी तीन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास फंड वार्षिक ७.७५ ते ८.००टक्क्यांदरम्यान परतावा देईल, अशी आशा करायला हरकत नाही.

hreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 1:38 am

Web Title: fund analysis on axis dynamic bond fund
टॅग Fund Analysis
Next Stories
1 यंदा धन बरसणार?
2 वित्त भान : संस्मरणीय बोध..
3 गाजराची पुंगी : डॉक्टरांचा इशारा!
Just Now!
X