‘लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंडा’च्या यादीत स्थान असलेला म्हणून ‘अर्थवृत्तान्त’च्या वाचकांच्या परिचयाचा हा फंड आहे. एकूण गुंतवणुकीच्या ८५ ते १०० टक्के दरम्यान लार्ज कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक असलेला हा फंड आहे. या फडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज व आयसीआयसीआय बँक या पाच आघाडीच्या गुंतवणुका लार्ज कॅप प्रकारातील असल्याने गुंतवणुकीला स्थर्य प्राप्त झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला अरिवद, अतुल, भारत फोर्ज, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, वॅबको इंडिया, टीमकेन इंडिया या सारख्या दर्जेदार व्यवस्थापन व गुंतवणूकदारांना आकर्षति करणारा ताळेबंद असलेल्या मिड कॅप कंपन्यांचा समावेश असल्याने गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीची वाढ अनुभवण्यास मिळाली आहे. फंड व्यवस्थापन गुंतवणुकीच्या ‘ग्रोथ’ व ‘व्हॅल्यू’ या दोन्ही प्रकारच्या समभागांचे शेअर बाजारातील वेगवेगळ्या परिस्थितीत योग्य ते प्रमाण राखण्यात यशस्वी ठरल्याने मागील ४० तिमाहीत संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा या फंडाने दिला आहे. सर्वसाधारणपणे फंडाची ८०% गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये तर उर्वरित मिड कॅप व रोकड संलग्न गुंतवणूक साधनांत राहिली आहे. मागील एका वर्षांत मिड कॅप समभागांच्या किमतीत अभूतपूर्व वाढ झाल्याने फंड व्यवस्थापनाने मिड कॅप गुंतवणुकीत नफा कमावण्यासाठी मिड कॅप गुंतवणुका उंचावलेल्या भावात विकून आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँकेसारख्या लार्ज कॅप गुंतवणुकीत टप्प्याटप्प्याने वाढ केली आहे. या धोरणाचा फायदा गुंतवणूकदारांना पुढील १२ ते १६ महिन्यांत दिसून येईल. व्याज दर संवेदनशील वाहन उद्योगाला रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याज दर घटविण्याच्या धोरणाचा फायदा मिळेल या दृष्टिकोनातून मारुती, टाटा मोटर्स, महिंद्रसारख्या वाहन उत्पादक व अन्य या उद्योगासाठी पूरक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांच्या समभागात फंड व्यवस्थापन जाणीवपूर्वक गुंतवणूक वाढवीत आहे.

Arth-Vrutant6-Chart.docx

सर्वोत्तम शार्प गुणोत्तर!

या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओचा ‘बीटा’ ०.९६ तर फंडाचे प्रमाणित विचलन (Standard Deviation) १४.३३ असल्याने जोखीम वगळून परताव्याचा दर योग्य राखण्यात फंड व्यवस्थापनाने एक आदर्श मानदंड निर्माण केला आहे. म्हणूनच ‘लार्ज कॅप’ फंड गटात या फंडाचा जोखीम संलग्न परताव्याचा दर (शार्प गुणोत्तर) ०.४४ असा सर्वोत्तम आहे. मागील दहा वष्रे ‘सिप’ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला १४.२९%, पाच वष्रे ‘सिप’ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला १४.६५%, तीन वष्रे ‘सिप’ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला १५.२५% व एक वर्ष ‘सिप’ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला -३.९६% परतावा मिळाला आहे. दहा वर्षांपूर्वी १,००,००० रुपये गुंतविणाऱ्या गुंतवणुकीचे २४ डिसेंबर रोजीचे बाजार मूल्य ३,९२,८७६ रुपये (परताव्याचा दर ४४.३३%), पाच वर्षांपूर्वी १,००,००० रुपये गुंतविणाऱ्या गुंतवणुकीचे २४ डिसेंबर रोजीचे बाजार मूल्य १,७७,१२५ रुपये (परताव्याचा दर १२.१६%), तीन वर्षांपूर्वी १,००,००० रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणुकीचे २४ डिसेंबर रोजीचे बाजार मूल्य १,६२,०६५ रुपये (परताव्याचा दर १२.८२%) असल्याने हा फंड ‘सिप’ तसेच एकरकमी एकदम मोठी गुंतविण्यासाठी सर्वार्थाने योग्य असल्याने या फंडाची शिफारस दोन्ही प्रकारची गुंतवणूक म्हणून करीत आहोत.

Arth-Vrutant6-Chart-2.docx

mutualfund.arthvruttant@gmail.com