01 June 2020

News Flash

सामोरे जातांना..

गुंतवणुकीचा दीर्घ कालावधी काळाच्या ओघात करोना बाधेमुळे झालेले नुकसान भरून काढेल.

(संग्रहित छायाचित्र)

जीजू विद्याधरन

गुंतवणुकीचा दीर्घ कालावधी काळाच्या ओघात करोना बाधेमुळे झालेले नुकसान भरून काढेल.

करोना विषाणूची लागण झालेल्या बाधितांच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या तसा जगभरातील भांडवली बाजारांच्यावर परिणाम झाला. भांडवली बाजारांच्या घसरणीचा परिणाम गुंतवणूकदारांना गुंतवणूक मुल्यांवर आणि विशेषत: समभाग गुंतवणूकीवर झालेल्या परिणामाची गुंतवणूकदारांना काळजी वाटत आहे. गुंतवणुकीच्या घटलेल्या मूल्याने गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात.

जानेवारीपासूनच करोना विषाणूची साथ फैलावत असल्याच्या बातम्यांनी जगभरातील प्रमुख समभाग निर्देशांकांमध्ये घसरण उडाली १ जानेवारी ते २५ मार्च दरम्यान ‘डाऊ जोन्स’ आणि ‘एफटीएसई १००’ निर्देशांक अनुक्रमे २६ आणि २५ टक्कय़ांनी घसरले. अन्य विकसनशील राष्ट्रांच्या निर्देशांक ‘आरटीएस’ (रशिया) आणि ‘बोवेस्पा’ (ब्राझील) अनुक्रमे ३५  आणि ३७ टक्कय़ांनी घसरले. याच कालावधीत भारतात निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे ३२ आणि ३१ टक्के घसरले. बाजाराने एखाद्या गोष्टीवर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. याआधी, स्वाईन, फ्लू (२००९), न्युमोनिया प्लेग (१९९४) वैश्विक वित्तीय संकट (२००८) आणि हर्षद मेहता घोटाळा (१९९२) यासारख्या घटनांवर बाजाराची नकारात्मक प्रतिक्रिया त्या वेळेला भयावहच वाटली.

भांडवली बाजारातील तीव्र घसरणीचा बाऊ करून समभाग गुंतवणुकीपासून फारकत घेणे यामुळे गुंतवणूकदारांनी स्वत:चे नुकसान करून घेतल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची पूर्तता न झालेल्या कालावधीत एका मोठय़ा समूहास जे अनुकरण करणे (दुसरे विकतात म्हणून विक्री करणे किंवा गुंतवणूक थांबविणे) हा पर्याय नक्कीच विवेकी नाही. अशा उतावळीपणाने गुंतवणूकदारांचे दीर्घकालीन आर्थिक लक्ष्य हुकण्याचा धोका असतो. अशा आततायी निर्णयांमुळे गुंतवणूकदाराची जोखीम सहन करण्याची क्षमता कमी होऊन वित्तीय नियोजनाचा बट्टय़ाबोळ उडतो.

करोना भीतीत सर्व काही अंधारासारखे दिसत असले तरी मुळात समभाग गुंतवणूक ही नेहमीच अल्पावधीत अस्थिर तर दीर्घकालावधीत फायद्याची ठरली आहे. गुंतवणूकदारांनी भावनिक पूर्वग्रहदूषित होणे टाळत आणि पूर्व नियोजित परतावा मिळण्यासाठी समभाग गुंतवणुकीतून माघार घेणे टाळावे. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा भांडवली लाभाचे फायदे मोजण्यासाठी ‘क्रिसील’ने पंधरा वर्षांच्या कालावधीसाठी एका वर्षांच्या परताव्याची चलत सरासरी अभ्यासली असता वेगवेगळ्या टप्प्यात गुंतवणुकीवरील परतावा नकारात्मक असला तरी दीर्घ मुदतीत ही नकारात्मकता लोप पावते. दीर्घ मुदतीच्या कालावधीच याच गुंतवणूक अचंबित करणारा परताव्याचा दर मिळविते.

बाजारातील घसरण येईल आणि जाईल परंतु इक्विटी गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. असे न केल्यास गुंतवणूकदारांच्या निवृत्ती नियोजन, मुलांचे उच्च शिक्षण आणि लग्न यासारख्या दीर्घकालीन उद्दीष्टांची पूर्तता होणार नाही. हे साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक महत्त्वाची आहे. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा दीर्घकालीन इसमभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा एक प्रभावी आणि सोपा मार्ग आहे.

(लेखक किसिलच्या फंड्स निश्चित व उत्पन्न संशोधन विभागाचे वरिष्ठ संचालक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 1:01 am

Web Title: long term investment and coronavirus crisis zws 70
Next Stories
1 कर  बोध  : ज्येष्ठ नागरिक  आणि प्राप्तीकर कायदा
2 अर्थ वल्लभ : सुरक्षितता आणि रोकड सुलभता
3 बाजाराचा तंत्र कल :  सौंदर्यातील सामर्थ्य
Just Now!
X