आशीष ठाकूर

गेल्या दोन महिन्यांतील प्रत्येक लेखात निर्देशांक सातत्याने सेन्सेक्सवर ३८,८०० आणि निफ्टीवर ११,६०० च्या स्तरावर टिकण्यात वारंवार अपयशी ठरत आहे. त्यामुळे निर्देशांक या पातळीच्या जवळपास पोहोचल्यावर गुंतवणूकदारांना सावध करायला हवे. कारण याच स्तरावर गुंतवणूकदारांना निर्देशांकाच्या उच्चांकाची गुलाबी स्वप्ने दाखून अक्षरश: भरीला पाडून उच्चांकी स्तराला समभाग गळयात मारले जातात आणि जेव्हा मंदीत खरी गुंतवणुकीची संधी असते तेव्हा गुंतवणूकदार हे नुकसानीत अथवा अपेक्षाभंगाच्या दारुण दु:खात अडकलेले असतात. हे टाळण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सेन्सेक्सवर ३८,८०० आणि निफ्टीवर ११,६०० चा स्तर हा ‘लबाडाघरचे आवतन’ तर दु:खांचे कितीही डोंगर कोसळले तरी सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० हे भरभक्कम आधार असतील. आताच्या तेजीत जे गुंतवणूकदार सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना खरेदीची ती पुन्हा एकवार संधी असेल, हे सूत्र आता काळाच्या कसोटीवर खरे उतरत आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स ३८,१२७.०८ / निफ्टी ११,३०५.०५

येणाऱ्या दिवसात निर्देशांक – सेन्सेक्सवर ३७,७०० आणि निफ्टीवर ११,१०० चा आधार घेत, त्यांचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,३५० आणि निफ्टीवर ११,३५० असे असेल. त्यानंतरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३९,००० आणि निफ्टीवर ११,६५० असे असेल.

आगामी तिमाही निकालांचा वेध..

१. एसीसी लिमिटेड

*  तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, १५ ऑक्टोबर

* ११ ऑक्टोबरचा बंद भाव – १,४४२.७५ रुपये

*  निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,५४० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,५४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६०० रुपये. भविष्यात १,५४० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,७०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,५४० ते १,६०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १,५४० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,४८० व त्यानंतर १,४२५ रुपयांपर्यंत घसरण.

२) एचडीएफसी बँक लिमिटेड

* तिमाही निकालाची नियोजित तारीख- शनिवार, १९ ऑक्टोबर

*  ११ ऑक्टोबरचा बंद भाव – १,१९८.५५ रुपये

*  निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,१७० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,१७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२३० रुपये. भविष्यात १,१७० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,३०० ते १,४०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,१७० ते १,२३० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १,१७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,१३० व त्यानंतर १,०७० रुपयांपर्यंत घसरण.

३) एशियन पेंट्स लिमिटेड

*  तिमाही निकालाची नियोजित तारीख – मंगळवार, २२ ऑक्टोबर

* ११ ऑक्टोबरचा बंद भाव – १,७९० रुपये

* निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,७०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने १,७०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,९०० रुपये. भविष्यात १,७०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,००० ते २,१०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,७०० ते १,९०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १,७०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,६२० व त्यानंतर १,५०० रुपयांपर्यंत घसरण.   (क्रमश:)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.