डॉ. अमेय त्रिपाठी या ३० वर्षांच्या तरुणाने तरुण वयामध्ये व्यवसायात बऱ्यापकी जम बसवलेला आहे आणि त्याचबरोबर उतारवयातील खर्चाबाबत काळजीही तो वाहतो आहे. अशावेळी त्याला एक विमा विक्रेता भेटतो आणि त्याच्यासमोर रिलायन्स लाईफ  प्लस या विमावजा पेन्शन पॉलिसीचा प्रस्ताव ठेवतो. ‘अॅशुअर्ड रिटायरमेंट सोल्युशन’ या तीन शब्दांना डॉ. अमेय भाळतो आणि पॉलिसी घेतो.
पॉलिसीचे लाभ :
पॉलिसीच्या २० वर्षांच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर कंपनी त्याच्या वारसाला विमाछत्राची रक्कम रु. २१,६२,८८७ देणार. विमाधारक पॉलिसीची टर्म तरून गेला तर २१ व्या वर्षी त्याच्या खात्यामध्ये खात्रीलायक अशी रु. २१,६२,८८७ इतकी गंगाजळी तयार होणार आणि त्या वर्षांपासून कंपनी विमाधारकाला दरवर्षी रु. १,१८,२४६ निवृत्तिवेतन देणार. त्यानंतरच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये विमाधारकाच्या वारसाला रु. २०,९८,०५७ इतकी रक्कम प्राप्त होणार.
एरवी हजार रुपयांचा एखादा फॉर्मल शर्ट खरेदी करतानाही कमीत कमी ३० ते ४० शर्ट उलगडून दुकानदाराला हैराण करणारा डॉ.अमेय निवृत्तीनंतरच्या आíथक व्यवस्थापनावर परिणाम करणाऱ्या गुंतवणुकीबाबत इतका कसा वाहवत गेला कोणास ठाऊक. विमा विक्रेत्याच्या ‘सेल्स टॉक’चा परिणाम असावा कदाचित. तेवढय़ाच पशामध्ये जास्त काळासाठीचे विमाछत्र आणि मोठय़ा प्रमाणात गंगाजळी तयार करता येईल काय याची साधी चौकशी करण्याची तसदीही त्याने घेतली नाही. त्याच्यासाठी दुसरा पर्याय नक्कीच उपलब्ध आहे.
पर्याय :
अमेय रिलायन्स लाईफ प्लस या पॉलिसीसाठी १० वर्षांमध्ये एकूण रु. १०,१७,००० खर्च करणार आहे. त्याच्याकडील गुंतवणुकीची सरासरी वार्षकि रक्कम होते १,०१,७०० रुपये. त्याने ९५ टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या विमा कंपनीची २५ लाख रुपयांच्या विमाछत्राची ३० वर्षांच्या टर्मची प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर त्याच्या वार्षकि प्रीमियमची रक्कम होते रु. ५,०८७. त्याच्याकडे दरवर्षी गुंतवणुकीसाठी म्हणून रु. ९६,६१३ (१,०१,७०० – ५,०८७) शिल्लक राहतात. समजा रु. ९६,६०० पकी त्याने दरवर्षी रु. ३,२०० हे १० वर्षांच्या बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविले आणि रु. ९३,४०० प्राप्तिकर बचतीच्या ठोस परताव्याच्या दुसऱ्या पर्यायामध्ये गुंतविले तर प्राप्तिकर वजा जाता निव्वळ ६ टक्के परतावा गृहीत धरला तर बँकेच्या मुदत ठेवीपासून त्याला ११ व्या वर्षांपासून ते २० वर्षांपर्यंत दरवर्षी रु. ५,७३० इतकी रक्कम प्राप्त होईल आणि दुसऱ्या पर्यायामध्ये दरवर्षी गुंतविलेल्या रु. ९३,४०० च्या गुंतवणुकीची ११ व्या वर्षी गंगाजळी होईल रु. १५,२६,६२६.

बँक मुदत ठेवींपासून ११ व्या वर्षांपासून २० व्या वर्षांपर्यंत दरवर्षी प्राप्त होणाऱ्या रु. ५,७३० पकी रु. ५,०८७ पॉलिसीचे प्रीमियम भरण्यासाठी आणि उरलेली रक्कम – ६४३ रुपये. समजा ६०० रुपये त्याने वरील दुसऱ्या पर्यायामध्ये दरवर्षी गुंतविले त्या गुंतवणुकीची २१ व्या वर्षी रु. ३५,४९,१६२ इतकी खात्रीलायक गंगाजळी तयार होईल. ती रक्कम त्याने बँकेच्या मुदत ठेवीमध्ये गुंतविली तर प्राप्तिकर वजा जाता ६ टक्के परताव्याने दरवर्षी रु. २,१२,१५० कायमस्वरूपी स्त्रोत तयार होईल. त्यापकी पुढील १० वष्रे म्हणजे २१ ते ३० वर्षांपर्यंत त्याला दरवर्षी रु. ५,०८७ पॉलिसीचे प्रीमियम भरावे लागेल आणि त्याची निव्वळ कमाई होईल रु. २,०७,०६३. ३० व्या वर्षी पॉलिसीची टर्म संपल्यावर वार्षकि कमाई होईल रु. २,१२,१५०. त्याच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये त्याच्या वारसाला रु. ३५,४९,१६२ ची प्राप्ती होईल. दुसऱ्या वर्षांचे प्रीमियम भरण्यापूर्वी अमेयला आपण कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता या प्रस्तावाला मान्यता देऊन ती पॉलिसी घेतली यामध्ये चूक तर नाही ना केली, अशी पश्चातबुद्धी झाली. समाधान करण्यासाठी त्याने एका तज्ज्ञाची भेट घेतली.
तज्ज्ञाचा सल्ला :
रिलायन्स लाईफ या पॉलिसीसाठी १० वर्षांमध्ये जितके पसे खर्च करणार त्यामध्ये जास्तीचे विमाछत्र जास्तीची टर्म आणि मोठय़ा प्रमाणात गंगाजळी तयार करता आली असती हा सल्ला ऐकल्यावर  अमेय अस्वस्थ झाला. यातून सुटका करता येईल का अशी त्याने विचारणा केली. त्या तज्ज्ञाचा होकार ऐकताच अमेयचा जीव भांडय़ात पडला.
तज्ज्ञाने सर्वप्रथम सल्ला दिला तो विमाछत्राबाबत. ‘डॉक्टर पेशाची व्यक्ती वयाच्या सत्तरीपर्यंत व्यवसाय करत असते. त्यामुळे त्या व्यक्तीचे विमाछत्र ७० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे’. त्या तज्ज्ञाने त्यांना २५ लाख रुपयांच्या विमाछत्राची ४० वर्षांच्या टर्मची पॉलिसी घेण्याचा सल्ला दिला.

दुरुस्ती :
चुकीची दुरुस्ती करण्यासाठी रिलायन्स पॉलिसी बंद करून पहिल्या वर्षी भरलेल्या प्रीमियमच्या रकमेवर (रु. १,०३,०९०) पाणी सोडावे लागले.
१. अमेय सदर पॉलिसीसाठी एकूण रु. १०.,१७,००० खर्च करणार होता. त्यापकी आता बाकी राहिलेली रक्कम रु. ९,१३,९१०. (१०,१७,०००-१,०३,०९०)
२. दरवर्षी गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेली रक्कम रु. ९१,३९१.
३. २५ लाख विमाछत्राच्या ४० वर्षांच्या पॉलिसीचे वार्षकि प्रीमियम रु. ६,३८३.
४. इतर गुंतवणुकीसाठी उपलब्ध रक्कम रु. ८५,००८ (९१,३९१-६,३८३) समजा रु. ८५,०००.
५. या रकमेपकी ३,९०० रुपयांच्या १० वर्षांच्या बँकेच्या मुदत ठेवीमध्ये आणि ८१,१०० रुपये प्राप्तिकर बचतीच्या दुसऱ्या पर्यायामध्ये दरवर्षी गुंतविले तर ११ व्या वर्षी दुसऱ्या पर्यायांची गंगाजळी होईल रु. १३,२५,५८२.
६.  बँकेच्या मुदत ठेवीपासून प्राप्त होणाऱ्या रकमेतून प्रीमियमचा भरणा केला आणि बाकी रक्कम दुसऱ्या पर्यायात गुंतविली तर २१ व्या वर्षी दुसऱ्या पर्यायाची गंगाजळी होईल रु. ३०,८२,३४९.
७. ही रक्कम बँकेच्या मुदत ठेवीमध्ये गुंतविली तर त्यापासून दरवर्षी रु. १,८४,९४१ चा (वार्षिक ६ टक्के परतावा) स्त्रोत सुरू होईल. त्यामधून पुढील १० वष्रे प्रीमियमचा भरणा केल्यावर निव्वळ रक्कम असेल रु. १,७८,५५८.
८. ४० व्या वर्षी पॉलिसीची टर्म संपली की वार्षकि रु. १,८४,९४१ चा स्त्रोत सुरू राहिल.
९. विमाधारकाच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये त्याच्या वारसाला रु. ३०,८२,३४९ ची प्राप्ती होईल.

निष्कर्ष :
डॉ. अमेयने पहिल्या वर्षीच्या प्रीमियमवर पाणी सोडून रु. १,०३,०९० चे नुकसान सोसूनही उरलेल्या पशामध्ये त्याला दुप्पट टर्मची आणि १५ टक्के जास्तीच्या विमाछत्राची पॉलिसी मिळते आणि सुमारे ४२ टक्के जास्त गंगाजळी तयार झाल्याने वार्षकि आवकही ५० टक्केपेक्षा जास्त रकमेने वाढते. वेळीच चुकीची दुरुस्ती करून आणि त्यामुळे होणारे नुकसान भोगून योग्य निर्णय घेतला तर भविष्यातील नुकसान टाळून बरेच काही प्राप्त करता येते.
(लेखामधील आकडेवारी एका डॉक्टरला दिलेल्या प्रत्यक्ष लेखाचित्रानुसार आहे.)
लेखक गुंतवणूक आणि विमा सल्लागार आहेत.