प्रश्न :  माझ्या आईने १२ जुल, २००४ रोजी ८६,००० रुपयांना बिगर शेती जमीन विकत घेतली. ती ७ फेब्रुवारी २०१४ रोजी ७,००,००० रुपयांना विकली. आईला दुसरा उत्पन्न स्रोत नाही. तिला कर किती भरावा लागेल? कर वाचविण्यासाठी कुठे गुंतवणूक करता येईल?  
– विजय बोरफालकर
उत्तर : आपल्या आईला खालीलप्रमाणे कर भरावा लागेल :
जमीन विक्रीतून मिळालेली रक्कम                    रु. ७,००,०००
खरेदी किंमत                                                     रु. ८६,०००
महागाई सूचक मूल्यानुसार* खरेदी किंमत        रु.१,६८,२३७
* महागाई सूचक निर्देशांक                          २००४-०५    ४८०
महागाई सूचक निर्देशांक                             २०१३-१४   ९३९
                                                                    —————
दीर्घ मुदतीचा करपात्र भांडवली नफा                रु. ५,३१,७६३

कराचे प्रमाण : (आई जेष्ठ नागरिक नसेल तर)
प्रथम २,००,००० रुपयांवर                                 शून्य
बाकी ३,३१,७६३ रुपयांवर (२०% प्रमाणे)     रु. ६६,३५३
शैक्षणिक अधिभार  ३%                                रु. १,९९१           
                                                                    ————
एकूण कर                                                   रु. ६८,३४४

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
low turnout in Phase 1 of Lok Sabha Elections 2024
मतटक्का घसरला, आयोगाला चिंता, पहिल्या टप्प्यातच कमी मतदान; पुढील टप्प्यांत टक्केवारी वाढविण्याचे आव्हान
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?

कराचे प्रमाण : (आई जेष्ठ नागरिक असेल तर)
प्रथम २,५०,००० रुपयांवर                                     शून्य         
शिल्लक २,८१,७६३ रुपयांवर (२०% प्रमाणे)     रु. ५६,३५३
शैक्षणिक अधिभार  ३%                                     रु. १,६९१           
                                                                     ————
एकूण कर                                                       रु. ५८,०४४
 
हा कर वाचवायचा असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत. दुसऱ्या घरामध्ये विक्री किमतीइतकी गुंतवणूक केली किंवा कलम ५४ ई सी प्रमाणे भांडवली नफ्याएवढी बाँड्समध्ये गुंतवणूक केल्यास कर भरावा लागणार नाही.

प्रश्न:  मला कर निर्धारण वर्ष २०१४-१५ साठी अग्रिम कर (अॅडव्हान्स टॅक्स) भरावयाचा होता. परंतु मी ऑनलाइन कर भरताना चुकून कर निर्धारण वर्ष २०१३-१४ आणि स्व-निर्धारण कर हा विकल्प निवडला. आता मी चलन कसे बदलून घेऊ?
–  शरद वेंगुल्रेकर
उत्तर : आपल्या अधिकार क्षेत्रातील प्राप्तीकर अधिकाऱ्याला पत्र लिहून चलनामध्ये कर निर्धारण वर्ष आणि प्रकार बदलण्यासाठी विनंती करावी लागेल.

प्रश्न:  मी एक सरकारी नोकर आहे मला घरभाडे भत्ता मिळतो. तो करपात्र आहे का? त्यावर काही सूट मिळते का? त्याबाबतचे नियम काय आहेत?
– धर्मेद्र चंदने
उत्तर: जर नोकरदार स्वतच्या घरात राहात असेल किंवा घरभाडे देत नसेल तर घरभाडे भत्ता हा पूर्णपणे करपात्र आहे. जर नोकरदार भाड्याच्या घरात राहात असेल तर प्राप्तीकर नियम२अ प्रमाणे खालील तीन रकमांपकी सर्वात कमी रक्कम करमुक्त आहे :
१.    जर घर हे मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा चेन्नई येथे असेल तर वेतनाच्या ५०% इतकी रक्कम  आणि जर घर इतर ठिकाणी असेल तर वेतनाच्या ४०% रक्कम
२.    नोकरदाराने ज्या कालावधीसाठी घर भाड्याने घेतले असेल त्या कालावधीसाठी मिळालेला घरभाडे भत्ता
३.    वेतनाच्या १०%पेक्षा जास्त दिलेले घर भाडे.
या साठी वेतनामध्ये मूळ वेतन आणि महागाई भत्ता (जर वेतनाचाच भाग असेल तर) याचाच समावेश होतो.

प्रश्न: मी आणि पत्नी दोघांच्या नावाने संयुक्त घर घेण्याचा विचार करीत आहोत. त्यासाठी बँकेतून ४५ लाख रुपयांचे गृहकर्ज दोघांच्या नावाने घेत आहोत. माझा प्रश्न असा आहे की, प्राप्तीकर कायद्यानुसार व्याज आणि मुद्दल रक्कम परतफेडीच्या सवलती दोघांनाही मिळू शकतात का?
– डॉ. संजय पाटील
उत्तर: घराचा करारनामा हा दोघांच्या नावाने असेल, दोघांच्या नावाने संयुक्त गृहकर्ज घेतले असेल आणि दोघांचा घरामधील आणि गृहकर्जाचा हिस्सा हा आधीपासून ठरविलेला असेल तर दोघांना प्राप्तीकर कलम २४ नुसार प्रत्येकाच्या हिश्श्याच्ी व्याज वजावट मिळविता येईल. त्याच प्रमाणे कलम ८० क नुसार घर कर्जाच्या मुद्दलीची परतफेड ही देखील त्यांच्या हिश्श्याप्रमाणे वजावटीस पात्र आहे. दोघांचे करपात्र उत्पन्न असेल तर हा लाभ घेता येईल.
गृहकर्जाच्या परतफेडीच्या हप्त्यामधील हिस्सा हा काळजीपूर्वक ठरविला पाहिजे. घराचे उत्पन्न, प्राप्तीकर वजावटीनंतर घर विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा या हिश्श्याप्रमाणेच ठरतो. यासाठी मालकी हिश्श्याचा करारनामा मुद्रांक कागदावर (Stamp Paper) वर करणे योग्य आहे.

प्रश्न: मी एक घर विकले. त्या घराची विक्री किंमत करारनाम्याप्रमाणे ४५,००,००० रुपये इतकी आहे. कराराची नोंदणी करतांना सह-निबंधकाच्या नोंदीप्रमाणे त्या घराचे बाजार मूल्य ५२,००,००० रुपये इतके दाखवले गेले. माझा भांडवली नफा हा ४५,००,००० रुपयांप्रमाणे असेल की, ५२,००,००० रुपयांप्रमाणे असेल?    
– एक वाचक
उत्तर: प्राप्तीकर कायदा कलम ५०क प्रमाणे करारनाम्याप्रमाणे मूल्य किंवा सह-निबंधकाच्या नोंदीप्रमाणे मूल्य ज्यावर मुद्रांक शुल्क भरले असेल यापेक्षा जे जास्त आहे ती रक्कम भांडवली नफ्यासाठी गृहीत धरावी. त्यामुळे आपल्या घराची विक्री किंमत ही ५२,००,००० रुपये धरून भांडवली नफा काढावा लागेल. जर करारनाम्याप्रमाणे मूल्य ५२,००,००० पेक्षा जास्त असते तर जास्तीची रक्कम भांडवली नफ्यासाठी धरली गेली असती.
प्रश्न: मागील वर्षांपासून घर खरेदीवर १% उद्गम कर (टीडीएस) अस्तित्वात आला आहे. तो कोणाला लागू आहे. त्यासाठी कर कपातीचा वेगळा नंबर घेणे गरजेचे आहे का? तो कसा भरावा?
–  एक वाचक
उत्तर: १ जुल २०१३ पासून जर कोणी निवासी भारतीयाला स्थावर मालमत्ता (शेतजमीन सोडून) हस्तांतरण करण्यासाठी पसे दिले तर प्राप्तीकर कायदा कलम १९४ आय ए प्रमाणे तर त्या रकमेच्या १% उद्गम कर (टीडीएस) भरणे बंधनकारक आहे. हस्तांतरण मूल्य जर ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर हे कलम लागू होते. जर हस्तांतरण मूल्य ५० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर टीडीएस भरणे बंधनकारक नाही. हा टीडीएस स्थावर मालमत्ता विकत घेणारा असतो त्याला भरावा लागतो. विक्रेत्याला रक्कम अदा करताना किंवा लेखामध्ये देय दाखवली आहे, जे आधी असेल तेव्हा टीडीएस भरावा लागतो. हा टीडीएस महिना संपल्यावर बँकेत सात दिवसाच्या आत भरावा लागतो. टीडीएस भरताना खरेदीदाराच्या पम्रेनंट अकाऊंट नंबर (पॅन) वर कर भरावा लागतो. त्यासाठी वेगळा नंबर घेण्याची गरज नाही. हा कर फॉर्म २६ क्यूबी मध्ये भरावा. हा कर भरल्यानंतर विक्रेत्याला फॉर्म १६ बी द्यावा लागतो.
उदाहरणार्थ, जर घराची किंमत ७० लाख ठरली असेल आणि १५ एप्रिलला १० लाख रुपये, ३० मे ला ४० लाख रुपये आणि बाकी रक्कम २० लाख १० जून रोजी दिली असेल तर पहिल्या १० लाख रुपयांवर १% म्हणजेच १०,००० रुपयांचा उद्गम कर एप्रिल महिन्यात भरावा लागेल. हा कर ७ मे पूर्वी फॉर्म  ‘२६ क्यूबी’मध्ये भरावा लागेल. दुसरी देय रक्कम ४० लाख रुपये जी ३० मे रोजी अदा केली आहे त्याचा उद्गम कर ४०,००० रुपये ७ जूनपूर्वी भरावा लागेल आणि तिसरी देय रक्कम २० लाख रुपये जी १० जूनला अदा केली आहे त्याचा उद्गम कर २०,००० रुपये ७ जुल पूर्वी भरावा लागेल.