’ आशीष ठाकूर

वर्षांरंभापासून सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारचा अपवाद वगळता निर्देशांक कधी दिवसांतर्गत, तर कधी साप्ताहिक उच्चांकी बंद अशा विविध तऱ्हा अनुसरत  नवनवीन उच्चांक मारण्यात मश्गुल होता. बाजाराचा गेल्या चौदा दिवसांचा हा अविर्भाव पाहिला तर, मंदीच्या बाबतीत एकूणच तो ‘पाहिले न मी तुला’ असा तोऱ्याचा होता. पण ही कसर सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी भरून निघाली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीचा वेध घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४९,०३४.६७

निफ्टी : १४,४३३.७०

आता अर्थसंकल्प हाकेच्या अंतरावर आहे. उद्योग, व्यापारजगत व सामान्य गुंतवणूकदारांच्या विविध अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून असतात व त्या फलद्रूप होतील अशी सर्वानाच अपेक्षा असल्याने निर्देशांकावर तेजीची कमान कायम राहील. अर्थसंकल्पाच्या नजरेतून निर्देशांकाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा सेन्सेक्सवर ४७,८०० आणि निफ्टीवर १४,००० असा असेल. जोपर्यंत हा स्तर राखण्यास निर्देशांक यशस्वी ठरतोय, तोपर्यंत तेजीच्या कमानीचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५०,००० ते ५०,७०० आणि निफ्टीवर १४,७०० ते १४,९०० असे असेल. जागतिक घडामोडी अथवा अर्थसंकल्पाकडून दारुण अपेक्षाभंग झाल्यास सेन्सेक्स ४७,८०० आणि निफ्टी १४,००० चा स्तर तोडून, त्यांचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४६,७०० आणि निफ्टीवर १३,७०० असे दिसू शकेल.

आता आपण गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊ या.

१) बायोकॉन लिमिटेड

०  तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २१ जानेवारी

०  १ जानेवारीचा बंद भाव- ४५६.७५ रु.

०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर -४५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ५२५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४१५ रुपयांपर्यंत घसरण.

२) एसबीआय कार्ड्स अ‍ॅण्ड पेमेंट्स सव्‍‌र्हिसेस लिमिटेड

०  तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २१ जानेवारी

०  १५ जानेवारीचा बंद भाव- ९५८.५० रु.

०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९२० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,००० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०७० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ९२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८८० रुपयांपर्यंत घसरण.

३) एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

०  तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २२ जानेवारी

०  १५ जानेवारीचा बंद भाव – ७०४.९० रु.

०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६३० रुपयांपर्यंत घसरण.

४) एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

०  तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २२ जानेवारी

०  १५ जानेवारीचा बंद भाव – ९१०.४० रु.

०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९८० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०१० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८५० रुपयांपर्यंत घसरण.

४) येस बँक लिमिटेड

०  तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २२ जानेवारी

०  १५ जानेवारीचा बंद भाव – १७.६५ रु.

०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १७ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १९ रुपये, द्वितीय लक्ष्य २१ रुपये.

ब) निराशादायक निकाल : १७ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १५.५० रुपयांपर्यंत घसरण.

५) लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लि.

० तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, २५ जानेवारी

० १५ जानेवारीचा बंद भाव – १,३५४.६० रु.

०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,३४० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,३४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,४५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,५२५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,३४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,२०० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.