बाजारात आजच्या सारख्या वावटळीच्या वेळीच ‘व्हॅल्यू स्टॉक्स’ उपलब्ध असतात. अशा संधींचा गुंतवणूकदाराने फायदा उठविला तर भविष्यात नफा होऊ शकतो. जगभरात मान्यता पावलेले हे तंत्र भारतात मात्र फारसे लोकप्रिय नाही.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीच्या शोधात गुंतवणूकदार नेहमीच असतात. आणि या संधी हुडकण्यासाठी विविध तंत्रांचा उपयोग केला जातो. यापकी अनेक वर्षांपासून काळाच्या कसोटीवर टिकलेले एक तंत्र म्हणजे ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ अर्थात कंपनीचा बाजारातील मूल्यांकनावर आधारीत संधीचा शोध.
बाजारातील सध्याचा भाव व प्रती समभाग मिळकत यांचे यांच्या गुणोत्तरास (प्राइस टू अर्निग्ज) ‘पी/ई’ असे म्हटले जाते. सध्या जे समभाग गुंतवणुकीस कमी पी/ईला उपलब्ध आहेत, परंतु त्या कंपन्यांना भविष्यातील उपलब्ध संधीचा फायदा होणार असल्यामुळे त्याचा नफा वाढल्यामुळे ‘पी/ई’ सुद्धा वर जाईल अशा कंपन्यांचा शोध घेण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. बऱ्याचदा बाह्य गोष्टींचा कंपनीच्या बाजारमूल्यावर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे कंपनीचे आजची बाजारातील किंमत कमी होते. परंतु भविष्यातील संधी अबाधित असल्यामुळे भविष्यात कंपनीचा भाव वर जाईल अशा गुंतवणुकीतील आकर्षक संधी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ या तंत्राने अवगत करता येतात. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या वर्षी दुष्काळ किंवा अन्य नसíगक आपत्तींमुळे बाजाराला नराश्याने ग्रासलेले असते. परंतु दुष्काळाचा एखाद्या वर्षांचा तो काळ गेल्यानंतर चांगल्या पाऊस पाण्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येते. ही परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर कंपनीला पुन्हा सुगीचे दिवस येतात. गुंतवणूकदाराने जर अशा तत्कालीन परिस्थितीचा फायदा घेऊन गुंतवणूक केली तर भविष्यात नफा होण्याची संधी असते.
केवळ उत्तम गुंतवणूक संधींचा लाभ घेऊन दंतकथा बनलेले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. परंतु बफे यांचे गुरूबेंजामीन ग्रॅहम हे सर्वसामान्यांना परिचित नाहीत. बेंजामीन ग्रॅहम आणि त्यांचे कोलंबिया विद्यापीठातील सहकारी डेव्हिड डॉड हे ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ या तंत्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांची ही थिअरी बफे यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करताना प्रत्यक्ष अवलंबिली. १९३४ मध्ये कोलंबिया विद्यापीठातील एका परिषदेत या दोघांनी ‘मार्जीन ऑफ सेफ्टी’ या नावाने हे तंत्र गुंतवणूक जगताला सांगितले. पुढे ‘सिक्युरिटी अ‍ॅनालिसीस’ या पुस्तकात या तंत्राविषयी खुलासेवार लिहिले. भविष्यातील एखाद्या कंपनीच्या मूल्याला त्यांनी ‘इंटरेन्सिक व्हॅल्यू’ असा शब्द वापरला. आणि ही ‘इंटरेन्सिक व्हॅल्यू’ वजा आजचा बाजारभाव बरोबर फायदा असा सिद्धांत मांडला   
आजच्या बाजारभावाचे प्रती समभाग मिळकतीशी गुणोत्तर (पी/ई), बाजारभावाचे पुस्तकी किंमतीशी गुणोत्तर (पी/बीव्ही), आजच्या बाजारभावाचे भविष्यातील वाढीशी (प्रोजेक्टेड ग्रोथ इन अíनगज) गुणोत्तर असे विविध निकष ‘व्हॅल्यू स्टॉक’ शोधण्यासाठी निश्चित केले गेले आहेत. त्यातूनच गुंतवणुकीतील जोखीम व आजची किमत, इंडस्ट्री पी/ई असे अतिरिक्त निकष पुढे आले आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे एखाद्या वावटळीच्या वेळीच ‘व्हॅल्यू स्टॉक्स’ उपलब्ध असतात. अशा संधींचा गुंतवणूकदाराने फायदा उठविला तर भविष्यात नफा होऊ शकतो. जगभरात मान्यता पावलेले हे तंत्र भारतात फारसे लोकप्रिय नाही. जगभरात ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’शी निगडीत म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेचे प्रमाण एकूण म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेच्या ५० टक्के म्हणजे निम्मे आहे तर भारतात म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमतेपकी अवघी १०% मालमत्ता या तंत्राशी निगडीत असलेल्या योजनांमध्ये आहे.  
‘व्हॅल्यू पिकिंग’ अर्थात आजच्या घडीला स्वस्त असलेल्या परंतु भविष्यात वाढणाऱ्या कंपन्याच्या शेअरची खरेदी ही एक कला आहे. ती सगळ्यांच जमते असे नाही. शेअर बाजारात अनेक वष्रे काढलेल्यांनाही ही कला अवगत नसते. सामान्य गुंतवणूकदार तर कायमच या तंत्रापासून दूर राहिला आहे. विराट कोहली किंवा शिखर धवन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच एखाद्या गोलंदाजाचा चेंडू ज्या कौशल्याने सीमारेषेपार धाडतो तेच कौशल्य आजच्या भावात एखादा भविष्यातील उत्तम संधी असलेला शेअर खरेदी करायला लागते. ते वैयक्तिक गुंतवणूकदारांना जमतेच असे नाही त्यासाठी व्यावसायिक कौशल्य आत्मसात केली गेली पाहिजेत. वर उल्लेख केलेल्या संख्यात्मक गोष्टींच्या व्यतिरिक्त आíथक आवर्तने, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरणातील बदल, लोकांचे अर्थात ग्राहकांच्या निवडींचे निकष अशा अनेक गुणात्मक गोष्टी यात अंतर्भूत होतात. त्या न कळल्यामुळे एक तर ग्राहकांचा बाजारात स्वत: गुंतवणूक केल्यामुळे तोटा तरी होतो किंवा ते स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजना म्हणजे बँकांच्या मुदत ठेवी वगैरेंमध्ये पसे गुंतवतात. हे व्यायसायिक कौशल्य आत्मसात केलेल्या म्युच्युअल फंडांकडे आपली गुंतवणूक सोपवणे म्हणूनच अधिक उत्तम.    
(लेखक आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)