अवंती फीड्स ही कोळंबी आणि माशांचे उत्पादन व निर्यात करणारी भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. १९९४ मध्ये उत्पादनाला सुरुवात केल्यापासून कंपनीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उत्तम प्रगती केलेली आहे. सुरुवातीला केवळ १००% निर्यातप्रधान प्रकल्प असलेल्या अवंती फीड्सचे दक्षिण भारतात कोळंबी उत्पादनाचे सध्याच्या घडीला चार प्रकल्प असून त्याकरिता कंपनीने तवान आणि जपानचे तांत्रिक सहाय्य घेतले आहे. तसेच थाई यूनियन फीड मिल या थायलंडमधील कंपनीबरोबर तांत्रिक आणि विपणन करार करून कंपनी उत्पादन आणि निर्यात व्यवसाय करीत आहे. गेले काही वष्रे सातत्याने उत्तम आíथक प्रगतीपथावर असलेल्या या कंपनीचे अत्यल्प कर्ज असून गुंतवणुकीवरील परताव्याचे प्रमाण अधिक आहे. केवळ नऊ कोटी भांडवल असलेल्या या कंपनीने .यंदाच्या जूनअखेर समाप्त तिमाहीसाठी उलाढालीत २६ टक्के वाढ दाखविला, तर तीवर ४२.६४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गत वर्षीच्या तुलनेत नफ्याच्या प्रमाण ६७ टक्क्य़ांनी अधिक आहे.  गेल्या तीन महिन्यांत या शेअरच्या भावात ५० टक्के वाढ झाल्याने हा शेअर थोडा महाग वाटू शकेल. मात्र तरीही प्रत्येक घसरणीला खरेदी करण्याजोगा हा शेअर आहे.

अवंती फीड्स लिमिटेड

(बीएसई कोड : ५१२५७३)

बाजारभाव : ” २,७०३

प्रमुख व्यवसाय : कोळंबी उत्पादन-निर्यात

पुस्तकी मूल्य : ” २८६.४०

दर्शनी मूल्य : ” १०/-

प्रति समभाग उत्पन्न : ” १४५.७२

किं/उ गुणोत्तर (पी/ई) : १८ पट

डेट/ इक्विटी गुणोत्तर : ०.२२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १४६

रिटर्न ऑन नेटवर्थ (%) : ५३.७६

बीटा : ०.७

बाजार भांडवल: ” २,३६८ कोटी

वार्षिक उच्चांक/नीचांक: “३२४५/१२४६

भरणा झालेले भागभांडवल: “९.०८ कोटी

शेअर होिल्डग पॅटर्न (%)

प्रवर्तक        ४४.२१

परदेशी गुंतवणूकदार  ३.४२

बँक्स/म्युच्युअल फंड्स      २.८१

इतर   ४९.५६
stocksandwealth@gmail.com