शेअर बाजार जुगार आहे, असा समज या बाजाराच्या प्रारंभापासूनच आजपर्यंत मराठी माणसाच्या मनावर कोरलेला आहे. परिणामी शेअर बाजारात मराठी माणसे क्वचितच आढळतात. असलेच त्यातही बहुतांश हे काही कंपन्या या ‘ब्लू चीप’ असतात असा गोड गरसमज करून अशा कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन वर्षांनुवष्रे कुरवाळत असतात, शेअर बाजार मराठी माणसासाठी सुरुवातीपासूनच दुर्लक्षित राहिलेले आहे व त्याबद्दल कायमच धास्ती राहिलेली आहे.
कोणत्याही देशाची प्रगती त्या देशामध्ये असलेल्या उधोगधंद्याच्या प्रगतीवर अवलंबून आहे व उधोगधंद्याची प्रगती त्या क्षेत्रात ओतल्या जाणाऱ्या भांडवलावर अवलंबून आहे, जगाच्या पाठीवर सर्व देशांमध्ये त्या त्या देशाची प्रगती औद्योगिक परिवर्तनाच्या मार्गाने होत असते व औद्योगिक परिवर्तनासाठी मोठय़ा भांडवलाची गरज असते, जे भागभांडवलाच्या रूपाने लोकांकडून भागवले जाते. त्यामुळे शेअर बाजार अत्यंत आवश्यक असा बाजारमंच आहे. शेअर बाजारामधील व्यवहार जोखमीचे आहेत, परंतु जर योग्य प्रशिक्षण घेतले व योग्य अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन घेतले तर त्यात प्रचंड पसाही आहे.
शेअर्स बाजारामध्ये हव्यास, लोभ व भीती यांचा लपंडाव सतत कार्यान्वित होत असतो. सर्वसाधारणपणे बाजारामध्ये गुंतवणूक करणारे किंवा खरेदी-विक्री करणारी मंडळी अधिकाधिक पसे कमवावेत म्हणूनच म्हणजेच लोभ, लालच व हव्यासापोटीच व्यवहार करीत असतात. बाजार वर जाईल या अंदाजाने शेअर्स किवा ‘कॉल’ खरेदी करतात. किवा बाजार खाली जाईल असा अंदाज करून शेअर्सची विक्री करतात किंवा ‘पुट’ खरेदी करतात, हा अंदाज चुकू शकतो ही भीती त्यांच्या मनात असते, पण भीती खरी ठरल्यास होणारे नुकसान टाळण्याचे पर्यायी डावपेच त्यांनी म्हणजे बऱ्याच मंडळींनी आखलेले नसतात. शेअर बाजारामध्ये फक्त ‘ऑप्शन्स’च्या (विकल्प) रूपाने नुकसान टाळण्याचे पर्यायी डावपेच म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत.
स्वत: जवळ असलेल्या शेअर्सची किंमत, गुंतवणूक किंवा कॅपिटल कोणत्याही परिस्थितीत कमी होता कामा नये व त्यात सतत वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश ऑप्शन्स खरेदी विक्रीमध्ये आहे, थोडक्यात कॅपिटल रिस्क मॅनेजमेंट हा ऑप्शन्समध्ये व्यवहार करण्याचा प्रथम क्रमांकाचा हेतू आहे. याकरिता मार्केटबद्दल किवा विशिष्ट शेअर्सबद्दल त्यांचा दृष्टिकोन काय आहे? दृष्टिकोन चुकला तर काय? आदी गोष्टी विचारात घेऊन अनेक प्रकारचे उपलब्ध असलेले डावपेच/रणनीती आखण्यात येतात.

सर्वसाधारण विशिष्ट दृष्टिकोन ठेवून खरेदी-विक्री करणारे लोक म्हणजे बाजार वर जाणार आहे म्हणून खरेदी किंवा बाजार खाली जाणार आहे म्हणून विक्री करणारे लोक शेवटी खूप मोठे आíथक नुकसान करत असतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. हे का होत असते याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.
बाजारामध्ये भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार- ऊकक व विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार-ोकक, म्युच्युअल फंड व मोठे गुंतवणूकदार व खूप मोठी मत्ता असणारे लोक तसेच बाजार चालवणारे ऑपरेटर्स यांच्या हाती करोडो रुपये व लाखो शेअर्स असतात, तसेच या मंडळींना अत्यल्प दलाली लागत असते. त्यांच्याकडे प्रगत संगणकप्रणाली व निष्णात कर्मचारी असतात. या मंडळींची बाजारात धोका पत्करण्याची क्षमता मोठी असते व बाजाराची दिशा बदलून भ्रम निर्माण करायची क्षमता सर्वसाधारण लोकांपेक्षा खूप जास्त असते. तसेच बचावासाठी ढाल अर्थात हेजिंगचा वापर ही मंडळी मोठय़ा खुबीने करतात. त्याचप्रमाणे सर्वसाधारण लोकांची नुकसान सहन करण्याची क्षमता त्यांना माहीत असते. त्या उलट सर्वसाधारण लोकांकडे रोकड किंवा शेअर्स अत्यंत तोकडी असतात. त्यामुळे कसेही करून सर्वसामान्य लोकांचे पसे आपल्या पोटात घालून त्यांना त्यांच्या व्यवहारामधून बाहेर घालवणे त्यांना सोपे जाते.
वरील अत्यंत महत्त्वाच्या कारणांमुळेच सर्वसामान्य गुंतवणूक करणाऱ्यांनी किंवा/ खरेदी-विक्री करणाऱ्यांनी बाजार वर जाईल किंवा खाली जाईल अशा भ्रमामुळे व्यवहार करणे अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी ऑप्शन्स ज्याला आपण ‘विकल्प’ म्हणू त्या शिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्यावे.
आज प्रत्येक दिवसाचा फ्युचर्स व ऑप्शन्सचा अंदाजे व्यवहार दोन कोटीच्या वर आहे. यावरून फ्युचर्स व ऑप्शन्स या व्यवहार पर्यायाची लोकप्रियता समजून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A popular type of shares market futures and options
First published on: 05-01-2015 at 01:03 IST