जीएसटीचा नक्की फायदा कोणत्या कंपन्यांना होईल, वगैरे अनेक चर्चाना गेले काही दिवस उधाण आले आहे. मात्र सुज्ञ गुंतवणूकदारांनी त्यात पडायची अजिबात गरज नाही. कारण दीर्घ कालावधीत याचा फायदाच संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे आणि समभाग गुंतवणूक ही दीर्घावधीसाठीच असते..
खपोर्टफोलियोचा सहामाही आढावा घेतानाच आपल्या गुंतवणुकीची पुढील वाटचाल कशी असेल याचाही विचार करणे आवश्यक असते. आतापर्यंत पोर्टफोलिओतील सर्वच कंपन्यांची वार्षिक आर्थिक कामगिरी गुंतवणूकदारांनी अभ्यासली असेल. फंडामेंटल अॅनालिसिस करणाऱ्या कुठल्याही गुंतवणूकदारासाठी हा अभ्यास फार महत्त्वाचा असतो.
चालू आर्थिक वर्षांची पहिली तिमाही खूप महत्त्वाच्या घडामोडींची राहिली. त्याचा गुंतवणुकीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होणार आहेच. यात प्रामुख्याने अंतिम मंजुरी मिळालेले वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक, बँकांच्या वाढत्या अनुत्पादित कर्जाबाबत सरकार आणि रिझव्र्ह बँकेने उचललेले निर्णायक पाऊल, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी, साखरेचे वाढते भाव, टेलिकॉम कंपन्यांची दयनीय अवस्था आणि त्यांनी नियमन मंडळाकडे घातलेले साकडे, अमेरिकेत फेडरल रिझव्र्हने वाढवलेले व्याज दर आणि रिझव्र्ह बँकेने पतधोरणात कु ठलाही न सुचविलेला बदल इ.घटनांचा समावेश करावा लागेल. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत देशभरात जीएसटी ही नवीन आणि क्रांतिकारी करप्रणाली सुरू झाली असेल. जीएसटीचा नक्की फायदा कोणत्या कंपन्यांना होईल, वगैरे अनेक चर्चाना गेले काही दिवस उधाण आले आहे. मात्र सुज्ञ गुंतवणूकदारांनी त्यात पडायची अजिबात गरज नाही. कारण दीर्घ कालावधीत याचा फायदाच संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे.
पहिल्या तिमाहीत आपला पोर्टफोलिओ ३.५ टक्के नुकसानीत होता. मात्र आपली गुंतवणूक मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी असल्याने हे सर्वच शेअर्स आणखी खरेदी/ राखून ठेवावेत असे सुचविले होते. या पहिल्या सहामाहीत पोर्टफोलिओमधील काही शेअर्स नुकसानीत असले तरीही संपूर्ण गुंतवणूक लक्षात घेता ते एकूण गुंतवणुकीवर ६.५ टक्के नफा दर्शवीत आहेत. तर एकू ण पोर्टफोलिओचा ‘आयआयआर’ पाहता तो १८.३९ टक्के आहे. पोर्टफोलिओमधील हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीने २:१ प्रमाणात बोनस जाहीर केला आहे, तर एल जी बालकृष्णने आपल्या शेअर्सचे १:१० असे विभाजन केले आहे.
गेल्या पाच वर्षांप्रमाणेच २०१७-१८ हे आर्थिक वर्षदेखील पोर्टफोलियोच्या वाचकांना आणि गुंतवणूकदारांना सुख-समृद्धीचे जाणार यात शंकाच नाही. नवीन वर्षांसाठी आणि पुढील गुंतवणुकीसाठी शुभेच्छा!
पहिल्या सहामाहीत पोर्टफोलिओमधील गुंतवणूक फक्त ६.५ टक्के नफा दर्शवीत आहे. तरी एकू ण पोर्टफोलिओचा ‘आयआयआर’ पाहता तो १८.३९ टक्के आहे.
सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.