आशीष ठाकूर ashishthakur1966 @gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजारातील तेजी-मंदीच्या घातक चढ उतारामुळे गुंतवणूकदार बेजार झाले आहेत. जर करोनामुळे बाजाराला खालीच यायचं होत तर, मध्येच निफ्टी निर्देशांकांनी १४,१५० वरून १५,००० वर का बरं जावं! निफ्टी निर्देशांक १५,००० च्या स्तरावर पोहोचतो न पोहोचतो तोच जगभरात पुन्हा करोना उफाळून आला व पुन्हा निफ्टी निर्देशांक १५,००० च्या स्तरावरून घसरून, १४,४००च्या स्तरावर आला.

राजकीय पटलावरील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा प्रत्यक्ष निकाल २ मेला आला. सर्वाधिक प्रकाशझोत असलेल्या पश्चिम बंगालचे निकाल भाजपच्या विरोधात गेल्याने आता निफ्टी निर्देशांक १४,००० चा स्तर तरी राखू शकेल काय, असे वाटत असतानाच, तो निर्देशांक पुन्हा बरोबर १४,४०० स्तराचा आधार घेत सुधारणेकडे अग्रेसर झाला.

अशा या घातक चढ-उतारामुळे गुंतवणूकदार खरेच त्रासलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसातील गुंतवणूकदारांच्या जीवनातली ही घडी निफ्टी निर्देशांकावर १४,२०० ते १५,२०० अशीच राहू दे ही गुंतवणूकदारांची भावना बनली आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४९,२०६.४७

निफ्टी : १४,८२३.१५

गेल्या लेखातील वाक्य होते – ‘अगदी अल्प मुदतीत निर्देशांकांनी चालू असलेल्या घसरणीत सेन्सेक्सवर ४८,०५० आणि निफ्टीवर १४,४०० चा स्तर सातत्याने राखल्यास पुन्हा मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक अपेक्षित आहे. जिचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४९,७०० ते ५१,४०० आणि निफ्टीवर १४,९०० ते १५,२०० असेल.’ या विधानाची प्रचीती सध्या आपण अनुभवत आहोत.

तेजी-मंदीच्या वाटचालीत निफ्टी निर्देशांकाने आपल्या भोवती ३०० अंशांच्या आखीवरेखीव वाटचालीचा परीघ निर्माण केला आहे. जसे की –

१) ३ मेचा निफ्टी निर्देशांकावरचा नीचांक १४,४०० + ३००अंश = १४,७००

२) १४,७०० + ३००अंश = १५,००० (महत्त्वाचा केंद्रबिंदू / वळणबिंदू स्तर)

३) निफ्टी निर्देशांकावर १४,४०० वरून घसरण झाली तर ती किती होणार तर १४,४०० उणे ३०० अंश = १४,१००. (२२ एप्रिलच्या नीचांकासमीप)

थोडक्यात १३,८००, १४,१००, १४,४००, १४,७००, १५,०००, १५,३००, १५,६०० अशी निफ्टी निर्देशांकाची भविष्यातील शिस्तबद्ध वाटचाल अथवा जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली असेल.

येणाऱ्या दिवसात निर्देशांकांनी म्हणजे – सेन्सेक्सवर ४८,९०० आणि निफ्टीवर १४,७०० या पातळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पातळ्या राखल्या गेल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १५,००० असे असेल. द्वितीय लक्ष्य सेन्सेक्सवर ५१,८०० आणि निफ्टीवर १५,३०० असेल. ही नाण्याची सकारात्मक बाजू झाली.

मे ते जून महिन्यातील घातक उतारांमध्ये सेन्सेक्स ४८,०५० आणि निफ्टी १४,४०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, सेन्सेक्सवर ४७,०५० ते ४६,००० आणि निफ्टी निर्देशांकांत १४,१०० ते १३,८०० पर्यंत घसरणीची मानसिक तयारी ठेवावी.

निकालपूर्व विश्लेषण

१) एशियन पेंट्स लिमिटेड

’ तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १२ मे

’ ७ मेचा बंद भाव – २,५५१.५० रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,५०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,७०० रु., द्वितीय लक्ष्य २,८५० रु.

ब) निराशादायक निकाल : २,५०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,४०० रुपयांपर्यंत घसरण.

२) जिंदाल स्टील अँण्ड पॉवर लिमिटेड   

’ तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १२ मे

’ ७ मेचा बंद भाव – ४८०.४० रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५३० रुपये, द्वितीय लक्ष्य ५९० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४०० रुपयांपर्यंत घसरण.

३) ल्युपिन लिमिटेड  

’ तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १२ मे

’ ७ मेचा बंद भाव – १,१९५.६० रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,१२५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,१२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२३० रु., द्वितीय लक्ष्य १,३३० रु.

ब) निराशादायक निकाल : १,१२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,०५० रुपयांपर्यंत घसरण.

४) व्होल्टास लिमिटेड

’ तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १२ मे

’  ७ मेचा बंद भाव – ९६९.३० रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,२०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ९५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९०० रुपयांपर्यंत घसरण.

५) सिप्ला लिमिटेड 

’ तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, १४ मे

’  ७ मेचा बंद भाव – ८८२.९५ रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०५०  रुपये.

ब) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८५० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about investment in share market stock market trading zws
First published on: 10-05-2021 at 00:01 IST