अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतामध्ये आज एनएसडीएल आणि सीडीएसएल या दोन डिपॉझिटरी सेवा कार्यरत आहेत. एनएसई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराने १९९६ मध्ये स्थापन केलेली एनएसडीएल आणि मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईने स्थापन केलेली सेंट्रल डिपॉझिटरी सव्‍‌र्हिसेस (इंडिया) लिमिटेड. शहरी आणि निमशहरी गुंतवणूकदारांना डिपॉझिटरी सेवा नवीन नाही. सीडीएसएल ही भारतातील एकमेव लिस्टेड डिपॉझिटरी कंपनी आहे. कंपनीच्या मुख्य भागधारकांमध्ये बीएसईखेरीज कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, एलआयसी आणि स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेचा समावेश आहे. १९९९ मध्ये स्थापन झालेली सीडीएसएल आज भारतातील अग्रगण्य आणि सर्वात मोठी डिपॉजिटरी असून तिचे दोन कोटींहून अधिक डीमॅटधारक आहेत. कंपनीचे १९,५००हून अधिक लोकेशन्समधून सेवा पुरविणारे ६००हून अधिक डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) आहेत. सीडीएसएल आपल्या उपकंपन्यांमार्फत इतरही अनेक महत्त्वाच्या सेवा पुरवते. यांत प्रामुख्याने सीडीएसएल व्हेंचरतर्फे केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सी (केआरए), सीडीएसएल इन्शुरन्स रिपॉझिटरी आणि सीडीएसएल कमोडिटी रिपॉझिटरीचा समावेश होतो. सध्या बहुचर्चित गिफ्ट सिटीमध्ये नोंदणी झालेली आणि सेबीने मान्यता दिलेली सीडीएसएल ही एकमेव डिपॉझिटरी आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central depository services company profile zws
First published on: 25-05-2020 at 01:06 IST