खरे तर सिप्ला या ८० वर्षे जुन्या भारतीय कंपनीबद्दल वाचकांना जास्त सांगायची गरज नाही. १९६८ मध्ये भारतात पहिल्यांदाच अ‍ॅम्पिसिलिनचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीने नंतर मागे वळून पाहिलेच नाही. आता केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सुमारे १७० देशांमध्ये औषध उत्पादने पुरवणारी सिप्ला आता खऱ्या अर्थाने भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी झाली आहे. २०,००० हूनही अधिक कर्मचारी असलेल्या सिप्लाची ३४ उत्पादन केंद्रे आहेत.

नेहमीच्या अ‍ॅन्टिबायोटिक्स व्यतिरिक्त सिप्लाची थॅलसेमिया, दमा, एड्स इत्यादी आजारांवरची संशोधन कामगिरी आणि औषधे फारच मोलाची आणि गुणकारी राहिली आहेत. जगभरातील सर्व दमेकरी सिप्लाने आणलेल्या इन्हेलर्समुळे दुवा देतात. जर्मनी आणि स्वीडनमध्ये इन्हेलर्सचा सध्याचा वाटा १५% असून येत्या वर्षभरात ब्रिटनची मान्यता मिळाल्यावर हा वाटा ५०% वर जाईल. तसेच अमेरिकेत देखील ‘तेवा’ या तेथील औषधी कंपंनीच्या सहाय्याने कंपनी नेक्सिअम हे उत्पादन विकते.
यंदाच्या आíथक वर्षांत या विक्रीतही चांगलीच वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कंपनीने १२ फायिलग्स (पेटंटसाठी) केली आहेत. येत्या दोन वर्षांत अनेक नवीन उत्पादने बाजारात येतील. या सर्वाचा सकारात्मक परिणाम कंपंनीच्या कामकाजावर होईल.
कंपनीचे यंदाच्या आíथक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. गेल्या आíथक वर्षांत १,१८१.०९ कोटींचा निव्वळ नफा कमावणाऱ्या या कंपनीचे गेल्या तिमाहीचे निकाल तितकेसे आकर्षक नव्हते. मात्र येत्या दोन वर्षांत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सिप्ला एक चांगली गुंतवणूक ठरू शकते.
stocksandwealth@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूचना : लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cipla shares information
First published on: 03-08-2015 at 01:02 IST