डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या कंपन्या विशेषत: उत्पादन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्या सामानाच्या वर्गीकरणाचे सूत्र अवलंबतात. मोठय़ा कंपन्यांमध्ये कच्च्या किंवा पक्क्या मालामध्ये नियंत्रण ठेवणे फार गरजेचे असते. यामागे चोरीला पायबंद हे कारण तर आहेच, पण योग्य माहिती, पुढील अंदाज, मालाचा साठवणुकीचा खर्च, संसाधनाचे धोरणात्मक वाटप वगैरेदेखील निर्धारित केले जाते. ही सूत्रे मुख्यत्वे करून ‘पारितो विश्लेषण’ या सिद्धांतावर अवलंबून आहेत. फार किचकट नाहीत पण समजून घ्यायला हवी. म्हणजे ज्या वस्तू जास्त किमतीच्या त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे, पण कमी किमतीच्या वस्तूंवर कमी नियंत्रण ठेवले तरी चालते. ऐंशी टक्के किमतीच्या वस्तू सुमारे वीस टक्के अशा प्रमाणात किंवा संख्येने असतात. त्यामुळे कंपन्या मोठय़ा किमतीच्या वस्तूवर जास्त लक्ष ठेवून असतात. जसे मोठय़ा अभियांत्रिकी व्यवसायामध्ये लहान-मोठे खिळे तर हवे तेवढे मिळतात किंवा विना-नियंत्रणाचे असतात, पण मोठी यंत्रे किंवा सुट्टे भाग मात्र विचार करून खरेदी केले जातात आणि त्यावर पूर्ण नियंत्रण असते. बऱ्याचशा कारखान्यांमध्ये वस्तूंवर नियंत्रण असते, पण काही गोष्टी जसे पुट्ठे, कागद किंवा इतर सामान इकडेतिकडे पडलेलेदेखील दिसते म्हणजे नियंत्रण फारच कमी. थोडक्यात काय तर मालाचे वर्गीकरण अ, ब किंवा क अशा श्रेणींमध्ये करणे आणि अ वस्तूंना अधिक नियंत्रण, ब वस्तूंना थोडेसे कमी नियंत्रण आणि क वस्तूंना किमान नियंत्रण.     

Web Title: Classification of goods in companies in manufacturing sector zws
First published on: 14-03-2022 at 01:06 IST