गाला समूहाने १९८४ मध्ये सुरू केलेल्या नवनीत प्रकाशनाने केवळ २८ वर्षांत मोठीच भरारी मारली आहे. इंग्रजी, मराठी, गुजराथी, हिंदी आणि इतर भाषांतही शालेय पुस्तके आणि इतरही माहितीपूर्ण पुस्तके प्रकाशित करणारी ‘नवनीत’ ही नाममुद्रा घराघरात पोहोचली आहे.  नवनीत, विकास आणि गाला या तीन ब्रॅण्ड्समार्फत कंपनीकडून पुस्तके, वह्य, स्टेशनरी व अन्य शालोपयोगी सामग्रीचा व्यवसाय केला जातो. भारतात आघाडीवर असलेली आणि स्वत:चे नाव टिकवून असलेल्या नवनीतने आता आखाती देश, अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतही प्रवेश मिळविला आहे. कंपनीने नुकतेच बाजारात आणलेले ‘यूटॉप’ हे टॅब्लेट क्रांतिकारी ठरणार आहेत. सध्या केवळ महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात ही उत्पादने उपलब्ध आहेत. सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार गेल्या दोन वर्षांत शालेय अभ्यासक्रम बदलण्यात येणार असून, राज्यातील बोर्ड, आयसीएसई आणि सीबीएसई हे एकाच पातळीवर आणण्याचा हा प्रयत्न आहे. बदलणाऱ्या अभ्यासक्रमामुळे येत्या दोन वर्षांत ‘नवनीत’कडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. उत्तम ब्रॅण्ड आणि चांगले प्रवर्तक असणारी ही कंपनी मध्यम ते दीर्घकालीन कालावधीसाठी आपल्या पोर्टफोलियोत ठेवाच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवनीत पब्लिकेशन्स
सध्याचा भाव     रु. ५८.५०
वर्षांतील उच्चांक/नीचांक    रु. ७१/५१
प्रवर्तक     : गाला कुटुंब
प्रमुख व्यवसाय    : शालापयोगी सामग्री
भरणा झालेले भागभांडवल    :    रु.  ४७.६४ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :    ६२ %
दर्शनी मूल्य       :     रु. २/-
पुस्तकी मूल्य       :     रु. १६
प्रति भाग मिळकत (ईपीएस)    :    रु. ३.८
किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :    १४.८ पट

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commerce share market majha portfolio ajay valinmbe navneet publication
First published on: 15-10-2012 at 02:01 IST