हीरो मोटोकॉर्पचे मार्च २०१३ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. गेले वर्षभर तसा फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या या कंपनीचे आर्थिक निष्कर्ष तसे आकर्षकही नाहीत. गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत विशेष वाढ न नोंदवता कंपनीने २३,७८६ कोटी रुपयांच्या विक्रीवर २१८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा (गतवर्षीच्या तुलनेत २% घट) कमावला आहे. यंदादेखील दुचाकीचे मार्केट तसे मंदीचेच राहण्याची शक्यता असल्याने २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठीही कंपनीकडून फारशा अपेक्षा नसल्या तरीही पुढील आर्थिक वर्षांत दुचाकी कंपन्यांच्या उलाढालीत १५% वाढ अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षांत कंपनीचे राजस्थान आणि गुजरातमधील प्रकल्प कार्यरत होतील. सध्या मोटरसायकल बाजारात सुमारे ५३.६% हिस्सा असलेल्या हीरो मोटोकॉर्पचा स्कूटरमधील हिस्साही आता १८.८% वर गेला आहे. मार्च २०१४ पर्यंत वार्षकि सुमारे ९० लाख दुचाकींचे उत्पादन करणारी हीरो ही भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरू शकेल. कंपनीने निर्यातीतही बाजी मारली असून आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील बाजारपेठ काबीज केली आहे. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हीरो तुमच्या पोर्टफोलिओत ठेवाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

   हीरो मोटोकॉर्प लिमिटेड
प्रवर्तक                     मुंजाळ  समूह
सद्य बाजारभाव                 रु. १,७०५
प्रमुख व्यवसाय                दुचाकी निर्मिती
भरणा झालेले भाग भांडवल             रु. ३९.९४ कोटी
पुस्तकी मूल्य :     रु.  ३२१           दर्शनी मूल्य : रु. २/-
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)            रु. १०६.१०
प्राइस अर्निग गुणोत्तर  (पी/ई)            १६ पट
मार्केट कॅपिटल : रु. ३४,०९७ कोटी        बीटा : ०.७
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक     :     रु. २,१५०/ रु. १,४३४
शेअरहोल्डिंग पॅटर्न (%)
 
प्रवर्तक    ५२.२१
परदेशी गुंतवणूकदार    ३०.५७
बँका / म्युच्युअल फंड्स    ८.४६
सामान्यजन  व इतर    ८.७६

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everlasting hero
First published on: 13-05-2013 at 01:01 IST