niyojan2सेवानिवृत्त झालेले चाकरमानी निवृतीपश्चात मिळालेला धनादेश बँकेत टाकतात. धनादेश वटताच त्याच बँकेत एका वर्षांची मुदत ठेव करतात. यात बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते. कारण माजी कर्मचारी म्हणून मुदत ठेवींवर त्यांना अतिरिक्त व्याज मिळते. एका वर्षांसाठी केलेल्या मुदत ठेवीचे कधी पाच-दहा वर्षांसाठी नुतनीकरण केले जाते हेच कळत नाही. म्हणून पसे कुठे व कसे गुंतवायचे याचा निवृत्ती आधीच विचार केलेला बरा.
अतुल पाटील (५५) यांनी खासगी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. निवृत्त होतेवेळी ते उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पत्नी लीना पाटील (५२) या याच बँकेत सहाय्यक उपाध्यक्ष या पदावर काम करीत आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्यास असलेल्या अतुल पाटील यांच्या बँकेने जानेवारी २०१५५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली. ही योजना जाहीर होताच अतुल पाटील यांनी लागलीच फेब्रुवारी महिन्यात स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला असून तो मंजूर झाल्यास  मिळालेल्या पूंजीचे नियोजन नियोजन कसे असावे याची साधकबाधक चर्चा त्यांनी केली होती. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यास त्यांच्या बँकेने त्यांचा अर्ज मंजूर झाल्याचे व १ एप्रिलपासून ते सेवामुक्त होतील असे त्यांना कळविले. पुढील दहा बारा दिवसांत त्यांना अपेक्षित असलेले सर्व पसे मिळतील. या पशाची गुंतवणूक कशी करावी यासाठी मार्गदर्शन करण्याची त्यांची विनंती आहे.
अतुल पाटील यांना ५२ लाखांची रक्कम अपेक्षित आहे. पाटील कुटुंबीयांवर कुठलेही कर्ज नाही. लीना पाटील या अजून निदान तीन वष्रे तरी नोकरी करतील असे आज तरी त्यांना वाटते. मागील आíथक वर्षांत लीना पाटील यांना करपश्चात दरमहा सरासरी ९७ हजार रुपये वेतन मिळाले. कटुंबाचा मासिक खर्च २५ हजार आहे. तीन ते पाच वर्षांनंतर लीना पाटील स्वेच्छा किंवा सेवानिवृत्त होतील तेव्हा त्यांनाही अतुल पाटील यांच्या इतकीच रक्कम मिळणे अपेक्षित आहे. लीना पाटील पुढील तीन वर्षांत दहा लाख साठवू शकतील.
सध्या लीना पाटील यांच्या दरमहा १२ हजारांच्या एसआयपी सुरु असून दोन हजार रुपये त्या त्यांच्याच बँकेच्या आवर्ती ठेवीत गुंतवीत आहेत. लीना पाटील यांची गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंडांचे ४ एप्रिल रोजीच्या ‘एनएव्ही’प्रमाणे एकूण मूल्य १८ लाख रुपये आहे, त्यांच्याकडे १२ लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.   
av-07
अतुल पाटील व लीना पाटील यांना बँकेच्या समूह आरोग्य विम्याचे छत्र निवृतीनंतर त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत लाभणार आहे. प्रत्येकी तीन लाख या प्रमाणे दोघांना एकूण सहा लाखाचे विमा छत्र लाभेल. सेवा निवृत्तीनंतर या योजनेचा हप्ता त्यांना भरावा लागेल. अतुल पाटील यांनी ‘बीओआय नॅशनल स्वास्थ्य बीमा पॉलिसी’ या समूह आरोग्य विमा योजनेचा लाभ घ्यावा. अतुल पाटील यांचे एक बचत खाते व काही मुदत ठेवी बँक ऑफ इंडिया मध्ये आहेत. बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी / निवृत्त कर्मचारी कर्जदार व ठेवीदारांसाठी ही विशेष आरोग्य विमा योजना आहे.
सेवानिवृत्त झालेले चाकरमानी निवृतीपश्चात मिळालेला धनादेश बँकेत टाकतात. धनादेश वटताच त्याच बँकेत एका वर्षांची मुदत ठेव करतात. यात बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते. कारण माजी कर्मचारी म्हणून मुदत ठेवींवर अतिरिक्त व्याज मिळते. एका वर्षांसाठी केलेल्या मुदत ठेवीचे कधी पाच-दहा वर्षांसाठी नुतनीकरण केले जाते हेच कळत नाही. म्हणून पसे कुठे व कसे गुंतवायचे याचा निवृत्ती आधीच विचार केलेला बरा.
आíथक नियोजक या नात्याने अतुल पाटील यांना पहिला प्रश्न विचारला तो असा की, एप्रिलचा पगार मे महिन्यात मिळणार नाही. तुम्हाला पुढील महिन्यापासून पेन्शन लागू व्हावी असे वाटते काय? व पेन्शन शिवाय कुठपर्यंत टिकाव धरू शकाल?
त्यावर लीना यांचा पगार सुरु आहे तोपर्यत तरी दरमहा पसे मिळाले नाही तरी चालेल, असे अतुल पाटील यांनी सांगितले. अतुल पाटील यांनी एनपीएस खाते उघडून पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ४० लाख रुपये जमा करावे. ही योजना Differed Annuity  प्रकारची असल्याने पेन्शन वयाची साठ वष्रे पूर्ण झाल्यानंतरच सुरु होईल. त्यांच्या वयाच्या एकसष्ठाव्या वर्षी सहा ते सात टक्क्य़ांदरम्यान Annuity Rate अपेक्षित असल्याने त्यांना साधारण २८ ते ३० हजार पेन्शन मिळेल. हा पर्याय अतुल पाटील यांना योग्य वाटला.  
अतुल पाटील यांनी यूटीआय रिटायरमेंट सोल्युशन्सकडे एकूण रकमेच्या ५० टक्के ‘ई क्लास’ म्हणजेच समभाग गुंतवणुकीचा पर्याय निवडून अर्ज सादर केला आहे. १५ दिवसात त्यांना PRAN म्हणजेच त्यांचा सेवा निवृत्ती निधी खाते क्रमांक मिळणे अपेक्षित आहे. हा खाते क्रमांक मिळाल्यानंतर त्यांनी या वर्षांसाठीची रक्कम दहा लाख रुपये त्या खात्यात जमा करावेत. पुढील वर्षांसाठीचे दहा लाख ‘लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंडां’च्या यादीतून शॉर्ट टर्म फंड किंवा आर्ब्रिटाज म्युच्युअल फंडात गुंतवावेत. ही रक्कम एप्रिल २०१६ पर्यंत गुंतवणूक करण्यासाठीच आहे. त्यांचे पीपीएफ खाते एप्रिल २०१७ मध्ये वीस वष्रे पुरे करीत आहे. यावर्षी व पुढील वर्षी प्रत्येकी दीड लाख पीपीएफ मध्ये भरावे. लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंडांच्या यादीतून रोखे म्युच्युअल फंडाची निवड करून प्रत्येकी पाच लाख चार समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या ‘डायरेक्ट’ पर्यायात (विक्रेता वगळून) गुंतवावेत. अतुल पाटील यांच्याकडे एकूण १७ लाखांच्या मुदत ठेवी आहेत. या ठेवींच्या मुदत पूर्तीनंतर ही रक्कम रोखे म्युच्युअल फंडात गुंतवावी.
लीना पाटील यांनी ही एनपीएस खाते उघडण्याचा अर्ज भरला असून त्यांनाही वार्षकि दोन लाख या खात्यात जमा करण्याचा सल्ला दिला आहे. सेवा निवृत्ती पर्यंत त्यांनी एनपीएस खात्यात दहा लाख भरावे असे ठरले.
लीना पाटील यांच्याकडे ३० लाखांची बचत उपलब्ध आहे. ही बचत गत पाच वर्षांत १७ टक्के चक्रवाढ दराने परतावा (CAGR) दिलेल्या ‘पीएमएस’मध्ये गुंतवावी असा सल्ला त्यांना पटला. एनपीएस खात्यात नक्की रक्कम भरावी की नाही हे आज ठरलेले नाही. रोकड सुलभतेचा विचार करून हा निर्णय लीना यांच्या निवृतीनंतर किंवा पाच वष्रे या पकी आधी जे घडेल त्यानुसार घेण्यात येईल.
अतुल व लीना त्यांच्या वयाच्या पंच्याऐशी वष्रे जगतील या उद्देशाने हे नियोजन केले आहे.