माझा पोर्टफोलियो’मधून आतापर्यंत सुचवलेल्या कंपन्यांचा लेखा-जोखा आपण घेणार आहोत. गेली काही वर्षे शेअर बाजाराचा नूर पाहता हा धोका पत्करायचा की नाही अशा विवंचनेत अनेक वाचक असतील. सुचवलेले शेअर पूर्ण अभ्यास करूनच विकत घ्यावेत असे मी नेहमीच सांगत असतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन आणि अभ्यासाची पद्धत. ती वेगळी असू शकते.
गुंतवणुकीसाठी आतापर्यंत सुचवलेल्या एकूण ४२ कंपन्यांच्या शेअरपकी ज्या शेअरमध्ये किमान ८ टक्के किंवा जास्त फायदा झालेला आहे त्या कंपन्यांचे शेअर आपण येथे पाहणार आहोत. तसेच त्या शेअरचे आता काय करायचे तेदेखील पाहू या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वेळी विश्लेषण करताना मी कफफ (आयआरआर) न घेता थेट किती टक्के फायदा झाला आहे ते देत आहे.
प्रत्येक शेअर वेगळ्या वेळी घेतल्याने त्याचा आयआरआर कमी-जास्त असू शकतो. म्हणजे अ‍ॅक्सिस बँक, टीव्हीएस मोटर्सचा आयआरआर तक्त्यात दिलेल्या परताव्यापेक्षा अनेक पटींनी जास्त असेल. तसेच यातलेच काही शेअर सुचवलेल्या तारखेनंतर अजूनही वर गेले होते; मात्र वाचकांच्या सोयीसाठी मी एकच तारीख म्हणजे १४ नोव्हेंबर ही ‘कटऑफ’ घेतली आहे.
पोर्टफोलियोसाठी शेअर निवडताना ते किती काळ ठेवायचे आणि त्यापासून आपल्याला किती टक्के लाभ अपेक्षित आहे याचा विचार करायलाच हवा. एखादा शेअर बरेच दिवस किंवा महिने ठेवूनही त्यात काही हालचाल होतच नसेल तर असा शेअर विकून टाकून त्याबदल्यात दुसऱ्या एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करावा.
अनेकदा आपण खरेदी केलेला शेअर वर जाण्याऐवजी खाली जाऊ लागतो. अशा वेळी शांत चित्ताने पुन्हा एकदा त्या शेअरचा आढावा घेऊन आपण केलेली खरेदी योग्य आहे का हे तपासणे जरुरी आहे. वेळ पडल्यास असे शेअर तोटय़ात विकून बाहेर पडणे कधी कधी शहाणपणाचे ठरते. आजच्या लेखात आपण फक्त ज्या शेअरमध्ये फायदा झाला आहे ते पहिले. पुढच्या लेखात आपण ज्या शेअरमध्ये नुकसान झाले आहे त्याचा अभ्यास करू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidence on shares purchasing
First published on: 18-11-2013 at 08:08 IST