माझा पोर्टफोलियो

अजय वाळिंबे
आरईसी लिमिटेड म्हणजे पूर्वाश्रमीची रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. १९६९ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आज सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपन्यांपैकी एक आघाडीची कंपनी आहे. ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत काम करणारी ही कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी) या दुसऱ्या मोठय़ा सरकारी कंपनीची उपकंपनी आहे. आरईसीच्या भरणा झालेल्या भागभांडवलापैकी ५२.६३ टक्के भांडवल पीएफसीचे आहे. गेल्या काही वर्षांतील ऊर्जा क्षेत्राची वाढती गरज आणि महत्त्व पाहता सरकारने सौभाग्य, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना इ. विविध योजना राबविण्यासाठी आरईसीची ‘नोडल एजन्सी’ म्हणून नेमणूक केली आहे.

मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीने ३७७,४१८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करून गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत त्यात १७ टक्के वाढ केली आहे. वितरण केलेल्या कर्जापैकी ९० टक्के हिस्सा सरकारी कंपन्यांचा असून सुमारे ४,००० कोटी रुपयांचे कर्ज वितरण ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत झाले आहे. तसेच कर्ज मंजुरीदेखील ४० टक्कय़ांनी वाढून १५४,८२१ कोटी रुपयांवर गेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या आर्थिक वर्षांत, मार्च २०२० च्या तुलनेत कंपनीच्या नक्त अनुत्पादित कर्जाच्या प्रमाणात घट होऊन ती ३.३२ टक्कय़ांवरून १.७१ टक्कय़ांवर आली आहेत. तसेच गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने आत्तापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे ८३७८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ६८ टक्कय़ांनी जास्त आहे.

Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध

ऊर्जा क्षेत्रासाठी भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. येत्या दोन वर्षांत रिन्यूएबल एनर्जी आणि संलग्न प्रकल्प सुमारे ४५० गिगावॅट वीज उत्पादित करतील. आत्मनिर्भर भारत योजना, इलेक्ट्रिक कार्स तसेच वाढते औद्योगिकीकरण पाहता आगामी कालावधीत कंपनीकडून वाढीव कर्जवाटप तसेच भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. उत्तम लाभांश देणाऱ्या या नवरत्न कंपनीचा शेअर सध्या १४५ रुपयांच्या आसपास आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून आरईसीचा विचार नक्की करा.

संक्षिप्त विवरण

६ शेअर गट    : लार्ज-कॅप

६ प्रवर्तक      : भारत सरकार/पीएफसी

६ व्यवसाय क्षेत्र : एनबीएफसी-ऊर्जा क्षेत्र

६ पुस्तकी मूल्य : रु. २२२

६ दर्शनी मूल्य : रु. १०/-

६ गतवर्षीचा लाभांश     : ११०%

शेअर शिफारसीचे निकष

  •  प्रति समभाग उत्पन्न :     रु. ४२.४
  • किंमत उत्पन्न गुणोत्तर :    ३.५८
  •  समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर :     ५.१४
  • डेट इक्विटी गुणोत्तर :       ७.५३
  • रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :     ९.२८
  •  नक्त एनपीए/अनुत्पादित मालमत्ता:   १.७१%
  •  नेट इंटरेस्ट मार्जिन :      ३.८९%
  • बीटा :    १.१

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.