Health Special: वास्तवात रुक्षत्व (कोरडेपणा), शीतत्व (थंडावा), खरत्व (खरखरीतपणा), चलत्व (गतिमानता), सूक्ष्म, लघु (हलका) हे वाताचे गुण आहेत. मात्र या सर्व गुणांमध्ये कोरडेपणा हा वाताचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे असे सुश्रुतसंहितेचे भाष्यकार आचार्य डल्हण सांगतात. साहजिकच कोरडेपणा हा वाताचा मुख्य गुण असल्याने त्याचा अतिरेक झाला की, तो मुख्य दोष ठरतो. शरीरामध्ये वाढणार्‍या कोरडेपणालाच आयुर्वेदाने शरीरामध्ये वात वाढण्याचे महत्त्वाचे कारण मानले आहे, त्याचा हा ग्रंथसंदर्भ.

स्नेहाचा अभाव

कोरडेपणा वाढवणारा रुक्ष (कोरड्या) गुणांचा आहार आणि विहार (जीवनशैलीतल्या चुका) यांमुळे शरीरामध्ये कोरडेपणा अवास्तव प्रमाणात वाढून कोरड्या गुणांचा वात वाढवतो, असे हे सरळ गणित आहे. वातप्रकोपास कोरडा (रुक्ष) आहार कारणीभूत होतो, असे म्हणताना इथे प्रत्यक्षात ज्यांच्यामध्ये स्नेहाचा (म्हणजे तेलतुपाचा) अभाव असलेले, ओलावा नसलेले असे स्पर्शाला कोरडे पदार्थ तर अपेक्षित आहेतच. उदा.- कुरमुरे, लाह्या,कोरडी चपाती वा भाकरी, भाजलेले पापड, टोस्ट- खारी- बटर, वगैरे. मात्र त्याचबरोबर पचनानंतर शरीरातला स्नेह (lipids) आणि ओलावा (moisture) खेचून घेणारे आणि कोरडेपणा वाढवणारे पदार्थ असाही अर्थ अपेक्षित आहे.

Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
Health Sepcial, Rishi Panchami, vegetables,
Health Sepcial: ऋषिपंचमीच्या दिवशी ‘या’ भाज्या का खातात? त्यातून कोणती पोषक तत्त्वे मिळतात?
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद
Drinking milk and jaggery before bed This Ayurvedic combo
रात्री झोपताना तुम्हालाही दूध पिण्याची सवय आहे का? मग १५ दिवसातून एकदा अशा प्रकारे करा दुधाचे सेवन; जाणून घ्या डॉक्टरांचे मत

हेही वाचा : Health Special: आधुनिक जगात मेन्टॉर्स खरंच असावेत?

कोरडे अन्न

२१व्या शतकामधील शहरी जीवनशैलीमधला एक महत्वाचा दोषही आपण या निमित्ताने समजून घेतला पाहिजे. कामावर जाणारे लाखो लोक सकाळी तयार केलेले जेवण डब्यामध्ये भरुन घेऊन जातात व दुपाराच्या लंचब्रेकमध्ये ते रुखे- सुखे जेवण खातात. अगदी मंत्र्या-संत्र्यापासून चपराशापर्यंत आणि कॉर्पोरेट मंडळींपासून म्युनिसिपाल्टीपर्यंत सर्वांनाच असे रुखे-सुखे जेवण खावे लागते. अहो, शाळेत जाणार्‍या वाढत्या वयाच्या मुलांनासुद्धा डब्यातले कोरडे पडलेले अन्न आपण देतो, तिथे इतरांची काय कथा? अशा जेवणाने शरीराला स्नेह-ओलावा तो किती मिळणार आणि पोषण ते काय मिळणार?

स्नेह नसेल तर सारे काही बिघडते

आयुर्वेदाने ‘स्नेहमयो अयं पुरुषः’ (हे शरीर स्नेहापासून तयार झालेले आहे) असे जे म्हटले आहे, त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. शरीरामध्ये स्नेह/ चरबी (fat/lipid) नसेल तर शरीरामधला कोणताही अवयव त्याचे कार्य व्यवस्थित करु शकणार नाही. त्वचेवर स्नेह-ओलावा नसला तर काय होईल? सांध्यांमध्ये स्नेह- ओलावा नसेल तर त्यांना चलनवलन करता येणार नाही. रक्तवाहिन्यांच्या आतून स्नेह/ ओलावा नसेल तर रक्तवाहिन्यांमधून रक्त सुरळीतपणे वाहाणार नाही,नसांमधून चेतनेचे वहन नीट होणार नाही, स्नायूंचे आकुंचन- प्रसरण व्यवस्थित होणार नाही, हृदयाची पंपिंग-क्रिया नीट होणार नाही, आतड्यातील पचनक्रिया व्यवस्थित होणार नाहीत; एकंदरच शरीरात स्नेह-ओलावा कमी होऊन कोरडेपणा वाढला तर शरीरामधील यच्चयावत क्रिया बिघडून जातील. दुर्दैवाने आधुनिक वैद्यकशास्त्र आहाराच्या या दोषांचा विचारही करत
नाही.

हेही वाचा : Health Special: लसूण आणि ग्लास स्किन, खरंच फायदा होतो का?

वातप्रकोपक कोरडे अन्नपदार्थ कोणते?

(आयुर्वेदीय आहार विमर्श, पृष्ठे१३७-१७५) वातप्रकोपास कारणीभूत होणारे रूक्ष म्हणजे शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारे आहारीय पदार्थ नेमके कोणते, ते सुद्धा जाणून घेऊ. यातले जे पदार्थ थंड आहेत, त्यांचा तसा उल्लेख केलेला आहे. कारण कोरडेपणानंतरचा वाताचा महत्त्वाचा गुण म्हणजे थंडावा. साहजिकच शरीरामध्ये थंडावा वाढवणारे पदार्थ हे शरीरामध्ये वात वाढवण्यास विशेषकरुन कारणीभूत ठरतात.

अति तिथे वात… म्हणून सांभाळून

इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, या पदार्थांचे सेवन झाले म्हणजे शरीरामध्ये वातप्रकोप झाला (वात वाढला) असा अर्थ होत नाही. कोणतीही विकृती (आजार) अनेक कारणे जेव्हा संयुक्तपणे एकत्र येतात, तेव्हा तयार होते. सहसा एकाच कारणामुळे नाही. उदाहरणार्थ तुमची वातप्रकृती असेल, तेव्हाचा काळ सुद्धा वातप्रकोपाचा म्हणजे वर्षा ऋतू असेल, त्याचवेळेला तुम्ही रात्री जागरण- अतिसंभाषण- अति चालणे- अति गायन- अति मैथुन- अतिव्यायाम वा अतिपरिश्रम केलेले असतील किंवा तुमच्या शरीरक्षमतेपेक्षा अधिक असा कामाचा- परिश्रमाचा बोजा पडल्याने शरीराच्या त्या -त्या अवयवावर खूप ताण पडला असेल, तुमच्या आहारामध्ये स्नेहाचा (तेल- तूप- लोणी वगैरेचा) अभाव असेल व तुम्ही शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारा व एकंदरच वात वाढवणारा असा आहार अतिप्रमाणात- सातत्याने घेत असाल; तर मात्र वातप्रकोप होण्याची शक्यता बळावते. शरीररुपी यंत्राच्या स्थूल- सूक्ष्म- अगम्य अशा विविध क्रियांमागील प्रेरक- संचालक- नियंत्रक अशा वाताचा प्रकोप होण्यामागे इतक्या कारणांची साखळी एकमेकांशी जुळून येते आणि तेव्हाच वातविकार जन्माला येतो!