अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) ही १९९८ मध्ये स्थापन झालेली कंपनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये गॅस वितरणाच्या व्यवसायात कार्यरत आहे. गेल (इंडिया) लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) यांच्यातील संयुक्त उद्यम म्हणून आयजीएलची स्थापना झाली. कंपनीच्या भागभांडवलात दिल्ली सरकारचादेखील ५ टक्के हिस्सा आहे. गेल्या २२ वर्षांत आयजीएलने आपल्या सेवांचा चांगलाच विस्तार केला असून, आज आयजीएल दिल्ली शहराव्यतिरिक्त नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, हापुड, गुरुग्राम, मेरठ, शामली, कानपूर, मुझफ्फरनगर, करनाल आणि रेवाडी, हमीरपूर, फतेहपूर, अजमेर, पाली, राजसमंद इ. भागांना गॅस पुरवते.

आयजीएल आज भारतातील अग्रणी आणि आघाडीची पीएनजी आणि सीएनजी गॅस वितरण कंपनी आहे. कंपनी ११ लाखांहून अधिक सीएनजी वाहने, १४ लाख घरगुती पीएनजी ग्राहक आणि ५५००हून अधिक व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना गॅस पुरवते. कंपनीची ५५०हून अधिक सीएनजी स्टेशन असून विविध स्वरूपात नैसर्गिक वायू विकते. कंपनीची स्टील पाइपलाइन १,१५० किलोमीटर तर एमडीपीईचे जाळे १३,५०० किलोमीटपर्यंत विस्तारले आहे. कंपनीचे दिल्ली आणि इतर भागांत सुमारे १४ लाख वायुपुरवठय़ासाठी जोडणी दिल्या आहेत.

सशस्त्र दलांकडून त्यांचे कॅन्टीन, लंगर, अधिकारी मेस आणि इतर आस्थापनांना सध्या वापरात असलेल्या एलपीजीकडून, पाइप्ड गॅस जोडणी अर्थात पीएनजीमध्ये बदलण्याचे कंपनीला कार्यादेश दिले आहेत. तसेच आयजीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने डीटीसी बसेससाठी राजघाट येथे प्रायोगिक तत्त्वावर एच-सीएनजी स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. हा देशातील या धर्तीचा एकमेव प्रकल्प आहे. आयजीएल लवकरच घरगुती उपकरणांमध्ये गॅसच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि विद्युत शक्तीवरील वाहनांसाठीही मोबाइल सीएनजी वितरण आणि चार्जिग सुविधा सुरू करण्याची योजना आखत आहे.

कुठलेही कर्ज नसलेली आयजीएल सातत्याने उत्तम कामगिरी करत असून गेल्या पाच वर्षांत कंपनीचा नफा सरासरी २०.३७ टक्क्यांनी वाढला आहे. सध्याच्या विस्तारीकरण योजना पाहाता आगामी कालावधीतदेखील कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. कंपनीचे सप्टेंबर २०२१च्या दुसऱ्या तिमाहीच्या आर्थिक कामगिरीचे निकाल लवकरच जाहीर होतील. सध्या ४७५ रुपयांच्या आसपास असलेला हा समभाग दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटतो.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड

(बीएसई कोड – ५३२५१४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ४७६/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ६०४ / ३७७

बाजार भांडवल : रु. ३३,३९० कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १४० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न           (%)

प्रवर्तक                    ४५.००

परदेशी गुंतवणूकदार            २३.८७

बँक/ म्यु. फंड/ सरकार         १९.७९

इतर/ जनता                 ११.३४

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    :            लार्ज कॅप

* प्रवर्तक       :            गेल / बीपीसीएल

* व्यवसाय क्षेत्र  :            गॅस वितरण

* पुस्तकी मूल्य :            रु. ९०.५

* दर्शनी मूल्य :                  रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश :               १८०%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :         रु. २०.२२

*  पी/ई गुणोत्तर :                  २३.५

*  समग्र पी/ई गुणोत्तर :             ४३.७

*  डेट इक्विटी गुणोत्तर :             ०.०२

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :          १४७

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :      २४

*  बीटा :                        ०.७

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indraprastha gas limited company profile zws
First published on: 25-10-2021 at 00:53 IST