scorecardresearch

बाजाराचा तंत्र-कल : सामर्थ्यांतील सौंदर्य..

सामथ्र्यवान पुरुषाच्या सामर्थ्यांत त्याचे सौंदर्य असते, तर सौंदर्यवान स्त्रीच्या सौंदर्यात तिचं सामथ्र्य असते.

बाजाराचा तंत्र-कल : सामर्थ्यांतील सौंदर्य..

आशीष ठाकूर
सामथ्र्यवान पुरुषाच्या सामर्थ्यांत त्याचे सौंदर्य असते, तर सौंदर्यवान स्त्रीच्या सौंदर्यात तिचं सामथ्र्य असते. आजच्या घडीला अमेरिकेत कर्जावरील व्याजदर, महागाईची धग यामुळे सर्व भांडवली बाजारांना आर्थिक भूकंपाचे हादरे बसत आहेत. प्रथम महागाईची धग व त्यामुळे ‘डाऊ जोन्स’ निर्देशांकावर १,३०० अंशांची घसरण झाली. नंतर प्रत्यक्ष कर्जावरील व्याजदर वाढवल्यानंतर ‘डाऊ जोन्स’ निर्देशांकावर ५०० अंशांची घसरण झाली. गेल्या दहा दिवसांतील घसरण-गाडीने, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व भांडवली बाजारात रक्तपात सुरू आहे. मात्र या सर्व उलथापालथीत निफ्टी निर्देशांकाने अवघी ७९७ अंशांची (१८,०८८ वरून १७,२९१) घसरण दाखविली. तुलनेने इतर आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात दिवसाला ५०० ते १,३०० अंशांची घसरण होत असताना, आपल्याकडे दहा दिवसांतील एकत्रित घसरण अवघी ७९७ अंशांची आहे, जी निफ्टी निर्देशांकाचे सामथ्र्य दर्शविते. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

गेल्या लेखातील वाक्य होते – ‘निफ्टी निर्देशांकावर १७,७३५ ते १७,९०० पर्यंत सुधारणा अपेक्षित आहे. या सुधारणेत १८,००० चा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १७,२०० ते १६,८०० असे असेल.’
मागील लेखातील हे वाक्य काळाच्या कसोटीवर तपासता, सप्ताहाच्या सुरुवातीला १९ सप्टेंबरला, १७,४२९ स्तराचा आधार घेत निफ्टी निर्देशांक १७,९१९ पर्यंत झेपावला. या सुधारणेत १८,००० चा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक अपयशी ठरत असल्यामुळे, त्याच वेळेला गुंतवणूकदारांनी १७,२०० च्या घसरणीची आर्थिक, मानसिक तयारी केली आणि सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी त्याची प्रचीतीदेखील आली. या वाटचालीतून तांत्रिक विश्लेषणशास्त्राचे सामथ्र्य दिसले, तर हे भाकीत प्रत्यक्षात आणण्यासाठी निफ्टीने ज्या काही लकबी दाखविल्या त्यातून निफ्टीच्या पदन्यासचे सौंदर्य दिसून आले. आता चालू असलेल्या निफ्टी निर्देशांकाच्या घसरणीला १७,२०० ते १७,००० स्तराचा आधार असेल. या स्तराचा आधार लाभल्यास, निफ्टी निर्देशांक १७,२०० ते १७,५०० स्तरावर पायाभरणी करताना दिसेल आणि त्याचे वरचे लक्ष्य हे १७,७०० ते १७,८०० असे असेल. या सुधारणेला पुन्हा १८,००० स्तराचा भरभक्कम अडथळा असून निफ्टी निर्देशांक १८,००० चा स्तर पार करण्यास आणि त्या उप्पर १७,२०० चा स्तर राखण्यासदेखील अपयशी ठरत असल्यास ‘भय इथले संपत नाही.’..तर मात्र निफ्टी निर्देशांकाचे पहिले खालचे लक्ष्य १६,८०० ते १६,५०० आणि द्वितीय लक्ष्य १६,२०० असे असेल.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ संकल्पनेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील भांडवली बाजारात रक्तपात सुरू आहे. त्यात या क्षेत्राचे बहुतांश ग्राहक हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील, भरीला युक्रेनमधील युद्धामुळे रशियातून युरोपात जो पाइपलाइनद्वारे गॅस पाठवला जातो त्याचा वापर आता येणाऱ्या हिवाळय़ात हाडे गोठवणाऱ्या थंडीत रशियाकडून तेलास्त्र म्हणून करत युरोपला वेठीला धरले जाणार काय? या विवंचनेत पडलेल्या युरोपात अस्मानी संकटामुळे बोकाळलेला दुष्काळ वगैरे प्रतिकूल परिस्थितीत संगणक, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची ‘दुष्काळातील तेराव्या महिन्यासारखी स्थिती’ तेव्हा या क्षेत्रातील कंपन्यांचे निकालपूर्व विश्लेषण करणे हे एक आव्हानच होते. पण बिकट, आव्हानात्मक परिस्थितीतदेखील ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ ही संकल्पना काळाच्या कसोटीवर खरी उतरली का? व त्यातून अल्प व दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांना फायदा झाला काय, याचा आढावा घेऊ या. या स्तंभातील ११ जुलैच्या लेखात ‘लार्सन अॅण्ड टुब्रो इन्फोटेक लिमिटेड’ या समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केले त्या समयी समभागाचा बंद भाव ४,०६४ रुपये होता, तर निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर ३,९०० रुपये होता. प्रत्यक्ष निकालानंतर समभागाने ३,९०० रुपयांचा स्तर राखल्यास निकाल चांगला असून, दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी समभाग राखून ठेवावा. चांगल्या निकालानंतर ४,४५० रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले. २२ जुलैला समभागाने ४,५९९ चा उच्चांक मारत लेखात नमूद केलेले ४,४५० रुपयांचे वरचे लक्ष्य साध्य केले. अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना ९ टक्क्यांचा परतावा यातून मिळविला. या मंदीत आतापर्यंत तरी समभागाने ३,९०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखला आहे. दाहक मंदीतदेखील उत्कृष्ट निकालानंतर समभागाचे जे ४,४५० रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले त्या वरच्या लक्ष्यासमीपच या समभागाने शुक्रवार, २३ सप्टेंबरला ४,४१७ रुपयांचा बंद भाव नोंदविला आहे. घडतंय ते नवलच!

शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५८,०९८.९२
निफ्टी : १७,३२७.३५

लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या