पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचा तिहेरी दृष्टिकोन

आíथक उचलीचे प्रमाण आणि वेळ या दोन्ही बाबतीत अपेक्षा खाली आल्या आहेत. वृद्धीला गतीवाढ देणा-या घटकांअभावी बाजार एका रूंद पल्ल्यात दृढ होईल. अल्प काळात येणारा उत्पन्न हंगाम, जागतिक बाजारातील हालचाली यामुळे शेअरच्या किंमतीमध्ये बरीच चंचलता शिरण्याची शक्यता आ

आíथक उचलीचे प्रमाण आणि वेळ या दोन्ही बाबतीत अपेक्षा खाली आल्या आहेत. वृद्धीला गतीवाढ देणा-या घटकांअभावी बाजार एका रूंद पल्ल्यात दृढ होईल. अल्प काळात येणारा उत्पन्न हंगाम, जागतिक बाजारातील हालचाली यामुळे शेअरच्या किंमतीमध्ये बरीच चंचलता शिरण्याची शक्यता आहे.

भांडवली बाजाराने गेल्या दोन महिन्यात चांगलाच खाली आला आहे. गेल्या आठवडय़ाभरात तर त्यात सलग घसरता क्रम राहिला आहे. जूनमध्येही सेन्सेक्स व निफ्टी या मुख्य निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.८% टक्के आणि २.४% नुकसान सोसले. जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींमुळे बाजार तणावाखाली आहेत. एका बाजूला युएस फेडद्वारे क्यूई आवरते घेण्याच्या संभाव्य मार्गदर्शनासंबंधाने जागतिक अनिश्चितता आहे, तर दुसऱ्या बाजुला वाढीव चालू खात्यातील तुटीमुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर मर्यादा पडतात हे रिझव्‍‌र्ह बँकेचे ठोस विधान आहे. यामुळे कंपन्यांच्या आíथक घडीला व्याजदरातील कपातीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याच्या अपेक्षांना धक्का पोहोचला आहे. भांडवली बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरत्या मूल्याचाही दबाव मे महिन्याच्या अखेरपासून काल-परवापर्यंत कायम आहे. महिन्याभरात चलन १०.४ % घसरले आहे. केवळ जून २०१३ च्या तुलनेत चलन ५.१ टक्क्यांनी घसरले आहे. विविध वस्तू व सेवांची किंमत आणि खर्च यावरील परिणामामुळे आयातीला पर्याय शोधण्यास प्रोत्साहन मिळणार असले आणि निर्यातीत वाढ होण्यास मदत होणार असली तरी अल्प कालावधीत निष्काळजीपणाने वित्ताधार घेऊन बनवलेल्या ताळेबंदला बरेचसे अडथळे येणार आहेत. धोरणात्मक वातावरण आघाडीवर निराशा झाली आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये प्राप्त झालेली सुरूवातीची चलती केव्हाच सरली आहे. शासकीय यंत्रणेचे सध्याचे लक्ष ‘ईझी मनी’ला आकर्षून घेण्याकडे आहे. दुर्दैवाने असा पसा उत्पादकही नसतो आणि दीर्घकाळ राहणाराही नसतो. या प्रक्रियेत प्रत्यक्ष बाबी हलवू शकतील अशा मुद्यांपासून प्रकाशझोत बाजूला सरकला आहे. या पाश्र्वभूमिवर पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी तिहेरी आघाडीचा दृष्टीकोन अवलंबणे केव्हाही चांगले.
पहिले – क्षेत्रांतर्गत तुलनात्मक मूल्य संधींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सध्याच्या चंचल असलेला काळ जागतिक विक्रीचा जोर असताना होणाऱ्या सहसंबंधाच्या हालचालीमुळे उचित मूल्यांकनापासून सध्याचे मूल्यांकन तात्पुरते ढळले आहे असे शेअर हस्तगत करण्याची नामी संधी देतो.
दुसरे – अनेक कंपन्यांनी संकटोपरांत आíथक वातावरणासंबंधीच्या गृहीतकांवर आधारून व्यवसाय प्रारूप उभारले आहे किंवा बदलले आहे आणि ते सुदृढ ठरले आहे अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत. मजबूत व्यवसाय प्ररूपाची सध्याच्या आकारमानाच्या तुलनेत मोठया असलेल्या बाजार संधीशी सांगड घातली गेली असल्यामुळे आपल्याला असे शेअर मिळतात जे उत्पन्नवृद्धी साध्य करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील उचलेवर जरूरीपेक्षा अधिक अवलंबून नसतात. शेवटी, सध्या उपलब्ध असलेली मुल्यांकने पाहता दीर्घकालीन परताव्याच्या संभाव्यतेला अजूनही धक्का लागलेला नाही. पुढील ३ ते ५ वर्षांत समभाग हे इतर मालमत्ता वर्गाच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून उच्च गुणवत्तेची सुधारणा झाली असता  शेयर्सना लाभ होईल असे शेअर बाळगणे आम्ही कायम ठेवले आहे.

लेखक बिर्ला सन लाईफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Portfolio management

ताज्या बातम्या