पुरेशी रोकड सुलभता असणारी मंडळीही समभाग गुंतवणूक टाळून बँकाच्या मुदत ठेवींचा मार्ग स्वीकारतात. अशा जोखीमदक्ष गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम (पीएमएस) हा सर्वात सोयीचा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या जोखीम पातळीला साजेसे रोखे व समभाग यांचे प्रमाण असलेले हा पर्याय सुचविणारे आजचे नियोजन..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफेद िशपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे
तुफान केव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो
क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
-कुसुमाग्रज

समुद्रात संचार करीत रोज नवीन क्षितिजे धुंडाळणारे केदार सोपारकर (३८) हे आजच्या नियोजनभानचे मानकरी आहेत. ते व्यापारी जहाजावर अधिकारी म्हणून नोकरी करतात. वर्षांतील आठ नऊ महिने समुद्रावर व तीन चार महिने जमिनीवर त्यांचे वास्तव्य असते. मुंबईतील ओल्रेम, मालाड येथील असलेले केदार यांचे वास्तव्य सध्या पुण्यातील वाकड परिसरात आहे. त्यांच्या पत्नी मनाली (३२) या पुण्यातील कायम विनाअनुदानित तत्वावर असलेल्या महाविद्यालयात व्याख्यात्या आहेत. मुलगा आयुष (५) पहिल्या इयत्तेत शिकत आहे. केदार सोपारकर यांचे वार्षकि वेतन ४० लाख असून सर्व वेतन करमुक्त आहे. मनाली यांना वार्षकि वेतन ६ लाखांपर्यंत असून मागील वर्षी त्यांनी १८ हजार प्राप्तिकर भरला. कुटुंबांवर कोणतेही कर्ज नाही.
* उत्पन्न करमुक्त असल्याने आपल्याला प्राप्तिकर विवरणपत्र (रिटर्न) दाखल करण्याची गरज नाही, असा बोटीवरील अनेक अधिकारी सहकाऱ्याप्रमाणे केदार यांचाही समज आहे. केदार यांनी ‘शून्य कर देय’ (नील रिटर्न) दाखल करणे जरूरीचे आहे. सरकार दरबारी दाखल केलेले रिटर्न हा उत्पन्नाचा दाखला आहे. केदार यांनी कर सल्ल्लागारामार्फत आपली मागील दोन वर्षांची आणि भविष्यातही नियमित रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे.
* केदार यांच्याकडे दोन पारंपारिक जीवन विमा पॉलिसी मिळून दहा लाखाचे विमाछत्र आहे. मनाली यांच्याकडे दोन पॉलिसी मिळून पाच लाखाचे विमाछत्र आहे. केदार जेव्हा आठ नऊ महिन्यांसाठी जहाजावर जातात तेव्हा दरवेळी केदार व जहाजाची मालकी असलेली कंपनी यांच्यात नोकरीचा नवीन करार होतो. या करारात केदार यांना देय वेतनाव्यतिरिक्त अन्य बाबींचा समावेश असतो. केदार जेव्हा जहाजावर असतात त्या काळापुरता केदार यांना अंदाजे पाच कोटीचे अपघाती विमाछत्र लाभते. या कराराचा कालावधी संपताच हे विमाछत्रही संपुष्टात येते. पुढील प्रवासाच्या वेळी नवीन करार होतो. केदार यांचे वय व त्यांना मिळत असलेले वेतन पाहता सुटीच्या काळात असलेले त्यांचे स्वत:चे विमाछत्र तुटपुंजे आहे. आयुषला साधारण वयाच्या पंचविसाव्या वर्षांपर्यंत केदार यांच्या आíथक मदतीची गरज असल्याने केदार यांनी २० वष्रे मुदतीचा पाच कोटी विमाछत्र असलेली पॉलिसी खरेदी करावी. अव्वल क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या कंपन्यांमध्ये एलआयसी ई-टर्मचा विमा हप्ता सर्वाधिक ६८,००० रु. तर सर्वात कमी एगॉन रेलिगेअरचा ४१,५७४ रु. आहे. हा मूळ विमा हप्ता असून यावर वाढीव सेवा कर व क्षैक्षणिक उपकर भरावा लागेल. पसंतीच्या कोणत्याही एका कंपनीचा मुदतीचा विमा खरेदी करावा. मनाली यांनी याच पद्धतीने २५ वर्षे मुदतीचा २५ लाखांचा विमा खरेदी करावा.
* सोपारकर कुटुंबीयांकडे सध्या आरोग्य विमा नाही. म्हणून त्यांनी ‘न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सची मेडिक्लेम २०१२’ ही आठ लाखांपर्यंत विमाछत्र देणारी पॉलिसी खरेदी करावी. पुरेशी रोकड सुलभता असणाऱ्या मनाली यांच्यासाठी गंभीर रोगावरील उपचारांच्या खर्चाला संरक्षण देणारी (क्रिटिकल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी) आíथक नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
े सध्या सोपारकर कुटुंबांकडे २२ लाखांच्या मुदत ठेवी आहेत. पकी चार लाख आकस्मिक खर्चासाठी मुदत ठेवींमध्येच ठेऊन उर्वरित रकमेचे फेरनियोजन करणे जरूरीचे आहे. सध्या मुदत ठेवींच्या रूपात असलेल्या रकमेच्या मुदतपूर्तीनंतर केदार सोपारकर यांनी ‘लोकसत्ता कत्रे’ म्युच्युअल फंड यादीतून रोखे गुंतवणूक करणाऱ्या तीन म्युच्युअल फंड योजना निवडून त्यांत प्रत्येकी सहा लाख गुंतवावेत.
* केदार व मनाली यांनी एलआयसी नोमुराच्या सेिव्हग्ज प्लस या योजनेत दोन हजाराची एसआयपी सुरू करून एलआयसीच्या विमा योजनांचे देय असलेले हप्ते या योजनेच्या जमा रकमेतून भरावेत.
* दैनंदिन खर्चासाठी केदार जहाजावर जाण्यापूर्वी त्यांच्या व मनाली यांच्या संयुक्त खात्यात पुरेशी रक्कम जमा करतात. एका वेगळ्या अर्थाने मनाली या त्यांचे संपूर्ण वेतन बचत म्हणून गुंतवू शकतात. प्रत्येक वर्षी अंदाजे २५ लाखांची शिल्लक केदार यांच्याकडे असते. या शिलकीचे नियोजन करण्यासाठी त्यांनी ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’चे सहाय्य घेण्याचे ठरविले होते. शाळांच्या सुट्टी सुरू असल्याने एप्रिल महिन्यात भारतात आलेल्या केदार यांनी सुचविलेल्या विविध पर्यायांमधून आपले वित्तीय नियोजन नक्की केले.
* मनाली व केदार यांनी पीपीएफ खाते आणि एनपीएस खाते उघडून, दोन्ही खात्यातून प्रत्येकी वार्षकि एक लाख ५० हजार जमा करणे जरुरीचे आहे. केदार अजून १२ ते १५ वष्रे नोकरी करू इच्छितात. या दरम्यान मोठा निवृत्तीकोश तयार करावा, असे वित्तीय ध्येय केदार यांनी निश्चित केले. केदार हे समभाग गुंतवणुकीशी फारसे सरावलेले नसल्याने समभागात गुंतवणूक करावी का आणि केल्यास कुठल्या मार्गाने करावी याबाबत त्यांचे तळ्यात मळ्यात सुरू होते.

‘पीएमएस’ काय?
गुंतवणूकयोग्य रक्कम मोठी असल्याने त्यांना चार पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सíव्हसेस (पीएमएस) परवानाधारकांची नावे सांगून त्यापकी एकाची निवड करण्यास सुचविले. ‘पीएमएस’ ही सेबी नियंत्रित सेवा योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांचे पसे स्वीकारण्यासाठी सेबीकडून परवाना घ्यावा लागतो. ही योजना राबविण्यासाठी सेबीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. अनेक गुंतवणूकदार सल्ला (अ्िर२१८) व ‘पीएमएस’ या दोन प्रकारात गल्लत करतात. अनेक बँका आपल्या मोठी रोकड बाळगणाऱ्या ग्राहकांना जी उत्पादने विकते ती सल्ला या प्रकारात मोडणारी आहे. म्युच्युअल फंडाकडून दिली जाणारी ‘पीएमएस’ ही व्यक्तिगत गुंतवणूक सेवा आहे. ही योजना मोठी रोकड सुलभता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरते. या योजनेत आधी ‘हर्डल रेट’ किंवा किमान परतावा मिळण्याचा प्रयत्न असतो (खात्री नव्हे). या दरापेक्षा अधिक परतावा मिळाला तरच ‘पीएमएस’ परवानाधारक गुंतवणूकदाराकडून शुल्क आकारतो.
विविध गुंतवणूक धोरणे राबवणारी सेवा ‘पीएमएस’अंतर्गत दिली जाते. व्हॅल्यू पोर्टफोलिओ किंवा मिडकॅप पोर्टफोलिओ हे दोन प्रकार गुंतवणूकदार विशेष करून स्वीकारतात. त्यांच्या जोखीम स्वीकारण्याच्या पर्यायप्रमाणे यापकी एकाची निवड करता येते. ही सेवा देण्याबद्दल परवानाधारक सेवाप्रदाता पोर्टफोलिओच्या रकमेवर दोन ते तीन टक्के शुल्क आकारतो. पीएमएस योजनेचा निधी व्यवस्थापक तुमच्या गरजेनुसार तुमच्या पोर्टफोलिओची रचना करतो. ठल्ल ऊ्र२ू१ी३्रल्लं१८ ढटर अशा प्रकारची एक सेवा आहे. या प्रकारात पोर्टफोलिओ मॅनेजर हा आपल्या अशिलांना सल्ला देत असतो हा सल्ला स्वीकारावा अथवा नाही हे सर्वस्वी अशिलांवर अवलंबून असते. दर तिमाहीला तर काही प्रसंगी दर महिन्याला तो पोर्टफोलिओचा तपशील आपल्या अशिलांना कळवत असतो.
पीएमएस खाते केदार यांनी स्वत:च्या नावांवर उघडण्याचे ठरवल्यास रिझव्‍‌र्ह बँकेत (वाणिज्य बँकेमार्फत) पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट स्कीम अंर्तगत ‘पीआयएस’ खाते उघडणे जरूरीचे आहे. मनाली यांचे नावे पीएमएस गुंतवणूक केल्यास त्या निवासी भारतीय असल्याने ‘पीआयएस’ खाते उघडण्याची जरूरी नाही.
दरम्यान पीएमएस सेवा देणाऱ्या तीन प्रतिनिधींनी केदार यांची भेट घेऊन ते देत असलेल्या सेवांचे सादरीकरण केले आहे. केदार हे या पकी एकाची निवड आपला पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून करतील आणि निवडलेल्या पोर्टफोलिओ मॅनेजरकडे खाते उघडण्याची औपचारिकता बोटीवर जाण्यापूर्वी पूर्ण करणार आहेत. एक माहीत नसलेला गुंतवणुकीचा मार्ग दाखविल्याबद्दल त्यांनी लोकसत्ता अर्थवृत्तान्त’बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
shreeyachebaba@gmail.com

 

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portfolio management schemes
First published on: 08-06-2015 at 10:40 IST