मागच्या भागात आपण बघितले की, सहा पायऱ्यांत गुंतवणूक कशी करायची. आता आपण क्रमाक्रमाने बघू की अशी गुंतवणूक करताना आपली गल्लत का व कशी होते ते. आज बघू या पहिली आणि अतिशय महत्त्वाची गल्लत आपण काय करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गल्लत क्रमांक १ :

आपण बऱ्याचदा बचत आणि गुंतवणूक एकच आहे असे समजतो, पण ते तसे नाही.

सर्व खर्च व देणी वजा करून उरलेली किंवा वाचवलेली रक्कम आपण बाजूला काढून फक्त कपाटात, बँकेच्या लॉकरमध्ये किंवा बचत खात्यात ठेवणे म्हणजे गुंतवणूक नसून ती झाली बचत. कारण त्यातून तुम्हाला फारसा परतावा मिळणार नाही. तर तुम्हाला ती रक्कम गुंतवावी लागेल आणि ती पण अशा गुंतवणूक पर्यायात ज्याचा परतावा हा महागाई निर्देशांकापेक्षा जास्त असेल. म्हणूनच जेव्हा आपण पारंपरिक विम्यामध्ये गुंतवणूक करतो तेव्हा ती गुंतवणूक सकारात्मक होत नाही. तो आपण आपल्यासाठी घेतलेला विमा असतो, गुंतवणूक नाही.

तर मग चला, आता बचत आणि गुंतवणूक यामध्ये काय फरक आहे ते विस्ताराने समजून घेऊ आणी संपत्तीनिर्मितीच्या मार्गावर पुढे जाऊ या.

बचत :

म्हणजे तुमचे सर्व खर्च व देणी देऊन झाल्यावर उरलेली रक्कम/ पसे.

(म्हणजेच जे पसे तुम्ही वाचवता ते म्हणजे बचत)

बचत = जमा – (खर्च + सर्व कर्जाचे हप्ते)

तर मग आता ही बचत कशी वाढवता येईल ते बघू या.

१. खरेदीवर नियंत्रण ठेवणे (वाटले म्हणून घेतले हे टाळणे गरजेचे आहे):

हल्ली बऱ्याचदा आपण क्रेडिट कार्डवर किंवा ऑनलाइन खरेदी करतो आणि अशी खरेदी करताना विचार करून नाही तर आवडले म्हणून आपण खरेदी करतो, ते टाळणे गरजेचे आहे.

२. आपल्या खर्चाचे बजेट करणे फार गरजेचे आहे.

३. गरजेचे नाहीत असे खर्च करणे टाळले पाहिजे.

४. नियमित बचत करणे गरजेचे आहे, मग ती कितीही कमी असली तरी चालेल.

५. जितक्या लवकर बचतीला सुरुवात कराल तितके चांगले.

तर मग आता बचत म्हणजे काय आणि ती वाढवण्यासाठी काय करता येईल ते आपण बघितले. अशी बचत केल्याने तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करता येणे शक्य आहे का? विचार करा. नुसती बचत करून भागणार नाही तर ते पसे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले पाहिजेत. तर मग आता गुंतवणूक म्हणजे काय ते समजून घेऊ.

गुंतवणूक :

अशी प्रक्रिया की, ज्यामुळे आपली बचत आपल्याला परतावा मिळवून देण्याचे काम करेल.

किंवा अशी गोष्ट करणे की, ज्यामुळे आपली बचत आपल्याला एवढा परतावा देईल की जो महागाई निर्देशांकापेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे आपल्या बचतीची क्रयशक्ती (स्र्४१ूँं२्रल्लॠ स्र्६ी१) कमी होणार नाही.

गुंतवणुकीचे फायदे :

१. बचत वाढवीत नेते.

२. आपलेच पसे आपल्यासाठी आणखी पसे मिळवून देण्याचे काम करायला लागतात.

३. महागाई निर्देशांकामुळे बचतीची क्रयशक्ती कमी होणे थांबवते.

४. बचतीत वाढ झाल्याने आपली गुंतवणूक ध्येये पूर्ण करण्यास मदत करते.

५. मनातील आíथक अस्थिरता नाहीशी होते.

६. संपत्तीनिर्मितीस मदत करते.

मग आता गुंतवणूक करताना काय काळजी घ्यायची ते पाहू या :

१. माझी धोका (रिस्क) घेण्याची क्षमता काय आहे हे ठरवणे.

२. मी निवडत असलेल्या गुंतवणूक पर्यायामध्ये काय धोका (रिस्क) आहे हे समजून घेणे.

३. असेच पर्याय निवडणे जे महागाई निर्देशांकापेक्षा जास्त परतावा देतील.

४. त्या पर्यायामुळे प्राप्तिकराच्या दायित्वात काय फरक पडेल ते पाहणे. (पण केवळ कर द्यावा लागेल किंवा नाही यावरून गुंतवणूक निर्णय घेऊ नका.)

५. गुंतवणूक पर्याय निवडताना त्यासाठी करावा लागणारा खर्च (जसे शेअर्ससाठी ब्रोकरेज इत्यादी) लक्षात घेणे आवश्यक आहे.

६. गुंतवणूक करण्याआधी योग्य ती माहिती करून घेणे आवश्यक आहे. जर ते शक्य नसेल तर गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा.

हे करू नका :

१. गुंतवणूक करण्याची घाई करू नका.

२. गुंतवणूक ही गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे.

३. नसती अटकळ मनी बाळगून सट्टा (स्पेक्युलेशन) लावू नका.

४. अडीअडचणीसाठी ठेवलेला पसा गुंतवणुकीसाठी वापरू नका.

५. कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नका.

६. विविधांगी पर्यायांमध्ये गुंतवणूक विभाजित करा.

cashevade.swati@gmail.com  

(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savings investment
First published on: 28-03-2016 at 02:12 IST