News Flash

आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २९ जानेवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : स्पर्धेत बक्षीस मिळेल. आनंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक तरलता दिसून येईल. अभ्यासूपणे निर्णय घ्याल. जुगाराची आवड पूर्ण कराल.
 2. वृषभ : आपल्याच मतावर ठाम राहाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. मनातील गैरसमज बाजूस सारावेत. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कमिशनच्या कामात लक्ष घालाल.
 3. मिथुन : जोडीदाराचे म्हणणे जाणून घ्यावे. जवळचा प्रवास सुखकारक होईल. उगाच नसत्या गोष्टी उकरून काढू नका. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्याल. विविध विषयात रुची दाखवाल.
 4. कर्क : बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. कौटुंबिक दिमाख दाखवाल. हातातील कामाकडे लक्ष द्यावे. अचानक झालेले बदल स्वीकारावेत. भावंडांना मदत करावी.
 5. सिंह : इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे लक्ष द्यावे. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.
 6. कन्या : मनातील नसत्या चिंता बाजूस साराव्यात. द्विधा मन:स्थितीतून बाहेर यावे. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.
 7. तूळ : मनातील इच्छा पूर्ण होतील. दिवस आळसात घालवाल. मनात मोठमोठ्या कल्पना रचल्या जातील. भावंडांशी मतभेद संभवतात. स्त्री समूहात वावराल.
 8. वृश्चिक : सामाजिक वजन वाढेल. घरासाठी नवीन काहीतरी खरेदी केले जाईल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न कराल. पराक्रमाला वाव मिळेल.
 9. धनू : अतातायीपणे निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यात सहभाग नोंदवाल. धर्मादाय संस्थेस मदत कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
 10. मकर : अतिविचार करू नका. कामे वेळेत पूर्ण करण्यास भर द्या. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. चिकाटी सोडून चालणार नाही. अचानक धनलाभ संभवतो.
 11. कुंभ : बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या सहकार्याने कामे पार पडतील मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कामात चंचलता आणू नका. काही गोष्टी काटेकोरपणे कराव्यात.
 12. मीन : इतरांच्या आनंदात आनंद मानाल. सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रवासात त्रास संभवतो.— ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 12:51 am

Web Title: daily astrology horoscope friday 29 january 2021 aau 85
टॅग : Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, गुरुवार, २८ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, बुधवार, २७ जानेवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, मंगळवार, २६ जानेवारी २०२१
Just Now!
X