02 March 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, शनिवार, २३ जानेवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष : कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. आवडीचे गोड पदार्थ चाखाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. क्षणिक सुखाचा आनंद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
  2. वृषभ : तुमचा प्रभाव राहील. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आवाजात गोडवा ठेवाल. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. चांगला आर्थिक लाभ होईल.
  3. मिथुन : फार विचार करत राहू नये. ध्यानधारणा करावी. इतरांसमोर आपली कला सादर करता येईल. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. वागण्यात धोरणीपणा दाखवाल.
  4. कर्क : मुलांच्या कारवायांकडे लक्ष द्या. जोडीदाराचे प्रभुत्व राहील. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. अती विचार करू नका. कफ-विकराचा त्रास जाणवेल.
  5. सिंह : कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवा. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. नवीन मित्र जोडले जातील. व्यावहारिक कुशलतेने वागाल. जोडीदाराशी मन-मोकळ्या गप्पा माराल.
  6. कन्या : इतरांचा विश्वास संपादन करावा. वादाला बळी पडू नका. कामाचा जोम वाढेल. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. धार्मिक स्थळांना भेट द्याल.
  7. तुळ : कामातील खाचा-खोचा जाणून घ्याव्यात. घाई घाईने निर्णय घेऊ नका. शेअर्स सारख्या कामांतून धनलाभ संभवतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. तोंडात साखर ठेवावी लागेल.
  8. वृश्चिक : अविचाराला बळी पडू नका. उताविळपणे निर्णय घेतले जातील. कामाच्या ठिकाणी काहीशी प्रतिकूलता जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. दृढ-निश्चय करावा लागेल.
  9. धनू : कौटुंबिक चिंता सतावेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवून वागावे. कामातून समाधान शोधाल. फसवणुकीपासून सावध राहावे.
  10. मकर : मनातील अनामिक भीती काढून टाकावी. काही कामे खिळून राहू शकतात. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगावी लागेल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. पैज जिंकता येईल.
  11. कुंभ : घरातील वातावरण आनंददायी असेल. गोड बोलण्याने सर्वांचे मन जिंकाल. कामातील बदल ध्यानात घ्या. आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करावा. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
  12. मीन : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. वरिष्ठांना नाराज करू नका. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. कामाची योग्य पोच-पावती मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

— ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:33 am

Web Title: daily astrology horoscope saturday 23 january 2021 aau 85
टॅग : Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २२ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, गुरुवार, २१ जानेवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, बुधवार, २० जानेवारी २०२१
Just Now!
X