Shani Astrology: ज्योतिषशास्त्रात शनी महाराजांना दंडाधिकारी मानले जाते. शनी देव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात असा समज आहे. त्याशिवाय ज्या राशीत शनीचे वास्तव्य असते व अन्य राशींच्या कुंडलीत ज्या स्थानी शनीची दृष्टी असते त्यानुसार शुभ- अशुभ, कमी- अधिक प्रभाव राशींच्या भविष्यावर पडत असतो. २०२३ च्या जानेवारी महिन्यात शनी महाराज कुंभ राशीत गोचर करून गेले होते तेव्हापासून शनीचा उदय, अस्त, वक्री प्रवास होत असला तरी स्थान मात्र बदललेले नाही. याचं कारण म्हणजे शनी हे अत्यंत संथ गतीने वाटचाल करतात परिणामी त्यांचे एका राशीतील वास्तव्य हे किमान अडीच वर्षे तरी असतेच त्यानुसार २०२५ पर्यंत शनी महाराज कुंभेतच असणार आहेत.
२०२५ पर्यंत मकर, कुंभ, मीन या राशींवर शनीची साडेसाती असणार आहे. या राशींना शनीचे पुढचे गोचर होईपर्यंत कष्ट सहन करावे लागू शकते. एक फायद्याची गोष्ट अशी की कुंभ राशीचे स्वामी शनी असल्याने आणि मकर व मीन राशीवर त्यांची कृपा असल्याने त्यांना कष्टासह लाभाचे सुद्धा संकेत आहेत. याशिवाय वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रातील तीन राशींच्या कुंडलीत २०२५ मध्ये नशिबाची तगडी साथ लिहिलेली दिसतेय. या राशींवर शनीची कृपादृष्टी असणार आहे. आर्थिक फायदा मिळवणाऱ्या या राशी कोणत्या व त्यांना कोणत्या रूपात लाभ होणार हे पाहूया..
२०२५ पर्यंत शनी महाराजांची ‘या’ तीन राशींवर असणार कृपादृष्टी
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
२०२५ पर्यंत शनी देव कुंभ राशीत असल्याने शनीची दृष्टी वृषभ राशीच्या कर्मस्थानी असणार आहे. यामुळे येत्या काळात तुम्हाला तुमच्या प्रत्येक सत्कर्माचा पुरेपूर लाभ मिळू शकतो. शिवाय अडकून पडलेली कामे सुद्धा पूर्ण होतील. काम झाल्याने व काम वाढल्याने आर्थिक स्रोत सुद्धा वाढतील परिणामी तुम्हाला प्रचंड मोठा धनलाभ होऊ शकतो. आपली आर्थिक स्थिती सुधारल्याने मनावरील ताण सुद्धा कमी होईल. समाजातील मान- सन्मान सुद्धा वाढीस लागेल. आपल्याला भागीदारीच्या किंवा वाडवडिलांच्या व्यवसायात लाभ कमावता येईल. २०२५ पर्यंतचा कालावधी आपल्यासाठी खूप शुभ असणार आहे. धनलाभासाठी जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरेल.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
सिंह राशीच्या मंडळींना शनीचा प्रभाव शुभ असणार आहे. या राशीच्या मंडळींनी जर चांगल्या मार्गे काम केलं, नीतीला धरून आचरण ठेवलं तर त्यांना शनीदेव त्यांच्या वागणुकीचे शुभ फळ देऊ शकतात. तुम्हाला कामाच्या निमित्ताने एखाद्या नव्या ठिकाणी वास्तव्याला जावे लागेल. शिक्षणाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. जोडीदाराच्या प्रेमाने भारावून जाल. तुम्हाला सुद्धा त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला नाती सांभाळून ठेवावी लागतील. नात्यांच्या रूपातच आयुष्यात सुख, सौभाग्य व आराम येऊ शकतो.
हे ही वाचा<< लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
तूळ राशीच्या मंडळींसाठी २०२५ पर्यंतचा कालावधी खूप फायदेशीर आहे तुमच्या करिअरला गती मिळू शकते. तुमच्या प्रगतीच्या व आर्थिक उन्नतीच्या वाटेत येणारे अडथळे दूर होऊ शकतात. प्रत्येक येत्या दिवशी तुमच्याकडील धन कमावण्याच्या संधी वाढतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. ज्या गोष्टीसाठी आपण प्रचंड मेहनत घेतलीत, त्या कष्टांचे फळ तुम्हाला मिळू शकते. पदासह पगारवाढ सुद्धा मिळू शकते. व्यवसायात मदतीचा हात देऊ शकतील असे संपर्क जोडता येतील. भौतिक सुख प्राप्त होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)