26 February 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, गुरुवार, ०४ फेब्रुवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष : शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वत:च्या इच्छा स्वत:च पूर्ण कराल. नवीन मित्र जोडाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
  2. वृषभ : उत्तम व्यावसायिक लाभ होईल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. कामात वडिलांची मदत होईल. आर्थिक कामात अधिक वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.
  3. मिथुन : वडीलधार्‍यांचा योग्य मान राखाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. हातातील कामात यश येईल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल. जवळचे नातेवाईक भेटतील.
  4. कर्क : आरोग्याची काळजी घ्यावी. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. मुलांच्या आनंदात रमून जाल.
  5. सिंह : घरातील कामात व्यग्र राहाल. मुलांचा धीटपणा वाढेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. वारसा हक्काच्या कामातून लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण समाधानाचे असेल.
  6. कन्या : जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. कौटुंबिक समस्या हिंमतीने सोडवाल. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.
  7. तुळ : आवडते पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. प्रवासात काही अडचणी जाणवतील. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. उगाच चिडचिड करू नका.
  8. वृश्चिक : आवडीच्या कामांमध्ये व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. खर्चाला वाटा फुटतील. बोलताना भान राखावे. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा.
  9. धनू : कामातील उत्साह वाढेल. उतावीळपणे निर्णय घेऊ नका. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. नवीन संधींसाठी काही वेळ द्यावा लागेल. मध्यस्थी कामात फायदा संभवतो.
  10. मकर : गोष्टींची अनुकूलता समजून घ्यावी. निराशेला बळी पडू नका. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात स्त्री वर्गाचा हातभार लाभेल. धार्मिक कामांत अधिकारवाणीने वावराल.
  11. कुंभ : श्रम अधिक वाढू शकतात. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. अतिविचार करणे टाळावे. व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता लाभेल. सर्वांशी गोड बोलाल.
  12. मीन : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवाल. कामातील बदलांची कुणकुण लागेल. आवडते छंद जोपासावेत. मदतीचा हात पुढे कराल.

    — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope thursday 04 february 2021 aau 85
टॅग : Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, बुधवार, ०३ फेब्रुवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, मंगळवार, ०२ फेब्रुवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, सोमवार, ०१ फेब्रुवारी २०२१
Just Now!
X